ETV Bharat / sitara

आर्यन खानविरुध्द कट रचणाऱ्यांना शाहरुख शिकवणार धडा?

author img

By

Published : Nov 22, 2021, 7:59 PM IST

शाहरुख
शाहरुख

मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) अडकवणाऱ्यांवर अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) काही कायदेशीर कारवाई करू शकतो. बॉलीवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई - ड्रग्ज प्रकरणी जामिनावर सुटलेल्या (Aryan Khan Drugs Case) आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी शाहरुख खान (Shahrukh Khan)काही कायदेशीर कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जातो. बॉलीवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार शाहरुख खानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, अभिनेत्याची टीम लवकरच यावर कठोर कारवाई करू शकते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या 14 पानांच्या सविस्तर आदेशात आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी असा कोणताही सकारात्मक पुरावा सापडला नसल्याचे म्हटले आहे. जेणेकरून त्यांनी गुन्ह्याचा कट रचला हे तपासता येईल. आर्यन खानच्या मोबाईलवरून घेतलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये इतर आरोपींनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे दाखवण्यासाठी काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

त्यामुळे आता आर्यनला अटक का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्यन आणि त्याच्या मित्रांना अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उच्च पोलीस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांना शाहरुख खानची कायदेशीर टीम हाच प्रश्न विचारणार आहे.

बॉलिवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, शाहरुख खानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, अभिनेत्याची टीम लवकरच यावर कठोर कारवाई करू शकते. शाहरुखला आर्यनला तुरुंगात टाकणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा जोरदार सल्ला दिला जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे,' असे या मित्राने अधिक माहिती न देता सांगितले.

हेही वाचा - Kangana's Statement Is Childish : कंगनाचे विधान बालीश, हास्यास्पद आणि चापलूसीने प्रेरित मुकेश खन्ना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.