ETV Bharat / city

aryan khan drugs case : आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण, वानखेडेंना निलंबित करा - नवाब मलिक

author img

By

Published : Nov 20, 2021, 9:01 PM IST

नवाब मलिक
नवाब मलिक

आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही, असे निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी या प्रकरणात पुन्हा बनाव असल्याचा आरोप केला आहे. आज (दि. 20) उच्च न्यायालयाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - आर्यन खान (aryan khan) याचा ड्रग्ज प्रकरणाशी (drugs case) किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही, असे निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) नोंदवले आहे. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी या प्रकरणात पुन्हा बनाव असल्याचा आरोप केला आहे. आज (दि. 20) उच्च न्यायालयाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बोलताना मंत्री नवाब मलिक

आपण सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते, असे म्हणत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. आता समीर वानखेडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील. मात्र, रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे. अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

समीर वानखेडे हे खोटे गुन्हे दाखल करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आली असून केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तत्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

हे ही वाचा - Minister Anil Parab सरकारची आडमुठेपणाची भूमिका नाही, समितीच्या अहवालावर विलिनीकरणाचा निर्णय घेऊ - अनिल परब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.