ETV Bharat / science-and-technology

भारतात रील्ससाठी इंस्टाग्रामचे नवीन '1 मिनिट म्युझिक' ट्रॅक लॉन्च

author img

By

Published : May 27, 2022, 2:39 PM IST

'1 मिनिट म्युझिक' ट्रॅक लॉन्च
'1 मिनिट म्युझिक' ट्रॅक लॉन्च

इन्स्टाग्रामवर रील बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने भारतात एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कलाकार आणि संगीत शोधण्यासाठी रील हे जागतिक व्यासपीठ आहे.

नवी दिल्ली - मेटा-मालकीच्या फोटो-शेअरिंग इंस्टाग्रामने गुरुवारी '1 मिनिट म्युझिक' ट्रॅकसह रील्ससाठी नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा केली. ही सुविधा सध्या फक्त भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. नवीन प्लॅटफॉर्म रील आणि स्टोरीवर वापरण्यासाठी संगीत ट्रॅक आणि व्हिडिओंचा संच ऑफर करतो आणि त्यात देशभरातील 200 कलाकारांचे संगीत समाविष्ट आहे, असे कंपनीने सांगितले.

पारस शर्मा, डायरेक्टर, कंटेंट आणि कम्युनिटी पार्टनर, फेसबुक इंडिया (META), यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “संगीत आज इंस्टाग्रामवरील ट्रेंडसाठी प्रेरणादायी आहे. खरं तर, रील लोकांसाठी संगीत आणि कलाकारांचा शोध घेण्याचे व्यासपीठ बनत आहे.

ते पुढे म्हणाले, '1 मिनिट म्युझिक' सह, आम्ही आता लोकांना ट्रॅकच्या एका खास सेटमध्ये प्रवेश देत आहोत ज्याचा वापर ते त्यांच्या रील्सला अधिक आनंददायक बनवण्यासाठी करू शकतात. आम्हाला आशा आहे की हे व्यासपीठ प्रस्थापित आणि नवोदित कलाकारांसाठी त्यांचे संगीत शेअर करण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल. कंपनीने म्हटले आहे की, कलाकार आणि संगीत शोधण्यासाठी रील हे जागतिक व्यासपीठ आहे.

कंपनीने पुढे म्हटलंय की, “लाँच झाल्यापासून, कलाकार त्यांचे संगीत लाँच करण्यासाठी आणि ते इतरांसोबत शेअर करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर अनेक ट्रेंड वाढले आहेत. याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतरांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी इन्स्टाग्राम आता '1 मिनिट म्युझिक' ट्रॅक जारी करत आहे. '1 मिनिट म्युझिक' लोकांसाठी रीलच्या ऑडिओ गॅलरीमध्येही वापरण्यासाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय चित्रपटात जॅकी श्रॉफ साकारणार 'स्लो जो'ची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.