ETV Bharat / opinion

शिवसेनेच्या राजकारणाला घराणेशाहीमुळे घरघर

author img

By

Published : Jul 21, 2022, 10:37 AM IST

Nepotism in politics
राजकारणातील घराणेशाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ( CM Eknath Shinde Rebellion ) आणि सेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदार, खासदार, नगरसेवकांसह घराणेशाहीतील (Dynastic politics) बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सामील होत, दगा दिल्याने मोजक्या नेत्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे ( Yuva Sena leader Aditya Thackeray ) राज्यात नेत्यांअभावी एकाकी पडल्याचे दिसून येते.

मुंबई - राज्यात घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मात्र घराणेशाहीमुळे राजकारणाला ( Dynastic politics ) घरघर लागल्याची बाब एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेतील ( Shiv Sena Politics ) फुटीनंतर चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेसह युवा सेनेला याचा फटका अधिक बसणार आहे. आगामी काळात घराणेशाहीला रोखणे सर्वच राजकीय पक्षापुढे आव्हान असणार आहे.


श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्ष यांच्यावर घराणेशाही मुळे देश आर्थिक डबघाईला गेल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रातही सध्या शिवसेनेला घराणेशाही मुळे मनस्ताप सहन करा लागल्याचे बोलले जाते. श्रीलंकेत देशाचा तर महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आणि सेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदार, खासदार, नगरसेवकांसह घराणेशाहीतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सामील होत, दगा दिल्याने मोजक्या नेत्यांचे अपवाद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे ( Yuva Sena leader Aditya Thackeray ) राज्यात नेत्यांअभावी एकाकी पडल्याचे दिसून येते.


घराणेशाहीमुळे शिवसेनेत मोठी फूट - बंडखोर नेत्यांकडून दुसरीकडे शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप केला जातो आहे. रामदास कदम यांनी नुकतेच त्याबाबत (Ramdas Kadam Confidential Blast ) गौप्यस्फोट करताना मुलाच्या राजकीय कारकीर्दबाबत हळहळ व्यक्त केली. काही फुटीरांकडून घराणेशाहीला डावलल्याचा सेनेवर आरोप सुरू आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंच्या भवितव्य संपवण्याचा घाट घेतला गेल्याचे म्हटले होते. ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असेही भाजपशी युतीचा हट्ट धरणाऱ्या फुटीर आमदार आणि खासदारांना सुनावले होते. मात्र, शिवसेनेत खासदारांपासून शेवटच्या शाखाप्रमुखांपर्यंत घराणेशाहीला अनेक भागात प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळेच शिवसेनेमध्ये पडलेल्या दोन गटात एकनाथ शिंदे गटाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.


सामान्य कार्यकर्ते मुख्य प्रवाहात कधी येणार - राजकारणात घराणेशाहीवर नेहमी बोलले जाते आणि टीका देखील केली जाते. मात्र तरीही घराणेशाही थांबायचे नाव मात्र घेत नाही. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे खासदार, आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या मुलाला युवा सेनेच्या सचिव पदी, आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित आमदार आहे, खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी नगरसेविका आहेत. कितीतरी सेनेतील उदाहरणे देता येतील. परिवारांचे वर्चस्व आणि त्याच परिवाराच्या वाट्याला सगळी राजकीय पदे उपभोगायला मिळत असल्याने स्थानिक पातळीवर वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे पक्षांमध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात संधी कधी मिळणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.


घराणेशाहीचा पायंडा लोकशाहीला घातक - घराणेशाहीचा फटका आज शिवसेनेला बसला आहे. घराणेशाहीमुळे अनेक पक्षात फूट पडल्याची उदाहरणे आहेत. परंतु, राजकारणात अपवाद वगळता सक्षम नेतृत्व निर्माण होत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हक्क, ज्येष्ठता डावलून फक्त घराण्याचाच वारसा पुढे आणला जातो. हा पायंडा लोकशाहीला घातक आहे. एकाच घराण्यात सत्ता राहिल्याने निर्माण होणारे दोष, अनिर्बंध सत्तेतून येणारी भ्रष्टता आणि दडपशाही टाळून निकोप लोकशाही रुजण्याची गरज आहे, असे मत राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी मांडले.

हेही वाचा : Sanjay Raut Tweet : ईडीचा फेरा असताना संजय राऊत म्हणतात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.