ETV Bharat / international

Death Penalty Indian Navy Personnel In Qatar : कतारमध्ये आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा, सरकारला धक्का

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 6:38 PM IST

Death Penalty Indian Navy Personnel In Qatar : कतारमध्ये आठ भारतीय माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्यानं भारताला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी कतारमध्ये त्यांना अटक करण्यात आली आली. न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारनं आश्चर्य व्यक्त केले आहे. हे सर्व लोक कतारमधील एका खासगी कंपनीत काम करत होते.

Death Penalty Indian Navy Personnel In Qatar
Death Penalty Indian Navy Personnel In Qatar

नवी दिल्ली Death Penalty Indian Navy Personnel In Qatar : गेल्या वर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतार न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. कतारमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध सुरू असल्याचं भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं.

नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना अटक : भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं की, "अल दाहरा कंपनीत काम करणार्‍या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना कतारमधील न्यायालयानं आपला निर्णय देत फाशीची शिक्षा केली आहे. यामुळं आम्हाला धक्का बसला आहे. फाशीच्या शिक्षेच्या निकालाच्या प्रतीची वाट आम्ही वाट पाहात आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे."

सर्व कायदेशीर सहाय्य देणार : भारत सरकारनं पुढं म्हटलं आहे की, "आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर सहाय्य देणार आहोत. आम्ही कतार न्यायालयाचा हा निर्णय तिथल्या अधिकार्‍यांसमोरही मांडू. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळं यावेळी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही."

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अधिकाऱ्यालाही अटक : कतार पोलिसांनी अटक केलेल्या 8 माजी नौसैनिकांमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पूर्णांदू तिवारी यांनी भारतीय नौदलात अनेक मोठ्या जहाजांचं नेतृत्व केलं आहे.

मार्चमध्ये पहिली सुनावणी : वृत्तानुसार, या वर्षी मार्चच्या अखेरीस पहिली सुनावणी झाली होती. अटक करण्यात आलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांपैकी एकाची बहीण मिटू भार्गव यांनी कतारमधून आपल्या भावाच्या सुटकेसाठी भारताकडं मदत मागितली होती.

हेही वाचा -

  1. Israel Hamas War Update : इंधनाचा तुटवडा, इस्रायली बॉम्बफेकीमुळं गाझामध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; इस्रायल हमास युद्धाचे अपडेट वाचा एका क्लिकवर
  2. Lewiston Maine Shootings : गोळीबारानं हादरली महासत्ता! लुईस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार, 16 हून अधिक ठार
  3. Ashok Gadgil Get National Medal : आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांचा जो बायडेन यांच्याकडून सन्मान, वाचा सविस्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.