ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 day 31 highlights: बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडे विक्की जैनपासून विभक्त, अनुराग ढोबळला शो सोडण्याची इच्छा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 10:08 AM IST

Bigg Boss 17 day 31 highlights: बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये घर बदलण्यावरून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या जोरदार वादापासून ते अनुराग ढोबळच्या घरातून बाहेर पडण्याच्या निर्णयापर्यंत अनेक नाट्यमय घटना घडल्या. बिग बॉसमध्ये सुरू असलेला हा तमाशा प्रेक्षक आवडीन पाहाताहेत.

Bigg Boss 17 day 31 highlights
बिग बॉस 17 दिवस 31 हायलाइट्स

मुंबई - Bigg Boss 17 day 31 highlights: बिग बॉसचं 17 पर्व रंगतदार होतंय. प्रेक्षकांना आकर्षित करुन शोमध्ये गुंतवून ठेवण्यात स्पर्धक यशस्वी होताना दिसतात. घरामध्ये रोज क्षणोक्षणी रंजक गोष्टी घडत असल्यामुळे स्पर्धकांवर प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत. याला शोचा 31 वा एपिसोडही अपवाद नव्हता. मारामारीपासून घरातील बदलांपर्यंत मंगळवारी प्रसारित झालेला एपिसोड मनोरंजनाने परिपूर्ण होता.

गेल्या दोन दिवसांपासून बिग बॉस 17 च्या घरातील तापमान वाढत आहे. संपूर्ण घर सततच्या भांडणांनी रणमैदान बनलंय. काही लोकांच्यात नातं घट्ट होतंय तर इतरांमधील दरी आणखीन वाढतेय. 14 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये या सर्व पैलूंचे प्रदर्शन घडलं.

बिग बॉसचं रिपोर्ट कार्ड आणि घरातील बदल - मंगळवारच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बिग बॉसनं प्रत्येक घरातील सदस्याचे रिपोर्ट कार्ड सादर केलं आणि प्रत्येकाच्या बेडरूमची पुनर्रचना केली. मुनव्वर, मन्नारा, ईशा, अभिषेक, अंकिता आणि समर्थ यांना आता 'दिल' घरामध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. विकी, अरुण, अनुराग, सना आणि तहलका आता या घरात राहतात. एपिसोडच्या अखेरीस 'दम' घरात राहणाऱ्या नील, ऐश्वर्या, खानझादी, रिंकू, नावेद आणि जिग्ना यांच्यावर शोचा संपूर्ण फोकस गेला.

विक्की जैनची रुम शिफ्ट झाल्यामुळे अंकिता लोखंडे नाराज - 'बिग बॉस 17' चा हा एपिसोड अनेक टर्न आणि ट्विस्टनं भरलेला होता. बिग बॉसनं प्रत्येक खोलीतील सदस्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या, परिणामी विकी जैन 'दिमाग' खोलीत गेला तर अंकिता पुन्हा 'दिल'च्या खोलीत राहिली. 'दिमाग' खोलीत प्रवेश केल्यावर विकी आनंदी दिसला कारण त्याच्याकडे संपूर्ण घर नियंत्रित करण्याची शक्ती होती. मात्र, या बातमीने अंकिता मात्र नाराज झाली.

विकी जैनवर भडकली अंकिता लोखंडे - विकी जैन आणि अंकिता यांच्यातील एकेकाळचं स्थिर नातं आता डगमगलंय. दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत. तिच्यापासून दूर असूनही 'दिमाग' रूममध्ये तो चांगला वेळ घालवत असल्याचा आरोप तिनं केलाय. तो जेव्हा गार्डन परिसरात भेटला तेव्हा ती त्याच्यावर भडकली. त्याच्या वागण्यावरुन तिनं त्याला भरपूर ऐकवलं.

अभिषेक कुमार आणि खानजादी यांच्या नात्याची चर्चा - अभिषेक आणि खानजादी यांच्यात सुखसंवाद सुरू आहे. त्यानं आपल्या भावना पुन्हा एकदा तिच्याकडं व्यक्त केल्यात. ती जी काही वागते ते खरंच आहे की कॅमेऱ्या पुरते आहे असे विचारताच तिनं हे वागणं कॅमेऱ्यासाठी नसल्याचं सांगितलं. खानजादी हिनं स्पष्ट केलं की हे वागणं कॅमेर्‍यांसाठी नाही परंतु हे बंधन दीर्घकालीन आहे की नाही हे फक्त वेळच सांगेल. तिनं सांगितले की तिला प्रवाहाबरोबर जाणं आवडतं आणि ती तिच्या हालचालींची गणना करत नाही.

अनुराग ढोबळला शोमधून बाहेर पडण्याची इच्छा आहे - बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अनुराग डोभाल या यूट्यूबरने वादग्रस्त रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमधून स्वेच्छेनं बाहेर जाण्याची इच्छा बोलून दाखवली. अरुण महाशेट्टीसोबतच्या भांडणानंतर तो दुखावला गेला आणि त्यामुळे त्यानं शोमधून स्वेच्छेनं बाहेर पडण्याची घोषणा त्यानं केली. त्यानंतर तो कन्फेशन रूममध्ये जाऊन बिग बॉसलाही ही इच्छा बोलून दाखवली.

सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 17 शो विविध पार्श्वभूमी असलेल्या 17 स्पर्धकांसह सुरू झाला. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि वीकेंडला रात्री ९ वाजता जिओ सिनेमा किंवा कलर्सवर प्रसारित होतो. प्रेक्षकांना रिअॅलिटी शो 24/7 थेट पाहण्याचा पर्याय देखील आहे.

हेही वाचा -

  1. Aquaman 2 Vs Dunky : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस आधीच रिलीज होणार 'अ‍ॅक्वामन 2'

2. Tiger 3 Enters 100 Crore Club : सलमान कॅतरिनाच्या 'टायगर 3' ने 2 दिवसात केला 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

3. Kareena Kapoor Reveals : सैफसोबत लिव्हइनमध्ये 5 वर्षे राहिल्यानंतर 'लग्न का केलं', करीना कपूरचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.