ETV Bharat / entertainment

वर्ष 2023 'जमाल कुडू' ते 'झूमें जो पठाण' या वर्षातील 9 लोकप्रिय गाणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 6:15 PM IST

Year Ender 2023 : हिंदी चित्रपटसृष्टीतील वर्ष 2023 मधील गाणी खूप हिट झाली आहे. या गाण्यांनी सर्वांचं खूप मनोरंजन केलं आहे.

Year 2023
वर्ष 2023

मुंबई Year Ender 2023 : वर्ष 2023 हे आता काही दिवसात संपणार आहे. शेवटचा महिना डिसेंबर अर्धा संपला असून अनेकजण नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनची तयारीत करत आहेत. वर्ष 2023 बॉलिवूडच्या दृष्टीने हिट ठरले आहे. याशिवाय 2022 वर्ष साऊथ सिनेमासाठी चांगले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील या वर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 2023 मध्ये, बॉलिवूडमधील एकामागून एक हिट गाण्यांनी अनेकांचे मनोरंजन केले. 2023 च्या आठवणी ताज्या करताना, आपण काही हिंदी गाण्यांबद्दल बोलणार आहोत. या हिंदी गाण्यांनी आपलं खूप मनोरंजन केलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जमाल कुडू गाणं : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या गाण्यानं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या गाण्याला अवघ्या काही तासांत दशलक्ष व्ह्यूज मिळाले. या गाण्यावर बरीच रील्स बनवली जात आहेत. 'जमाल कुडू' हे 2023चं हिट गाणं ठरलं आहे. (व्ह्यूज- 18 दशलक्ष तीन दिवसांपूर्वी रिलीज)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सारी दुनिया जला देंगे गाणं : 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'सारी दुनिया जाला देंगे' हे गाणंही लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. हे गाणं पंजाबी गीतकार जानी यांनी लिहिलं असून गायक बी प्राक यांनी उत्तम गायलं आहे. (व्ह्यूज- 36 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अर्जन व्हॅली : 'अ‍ॅनिमल'चे तिसरे हिट गाणे 'अर्जन व्हॅली' देखील चार्टबस्टर्समध्ये अव्वल आहे. हे गाणं पंजाबी गायक भूपिंदर बब्बलनं गायलं आहे. या गाण्याला अनेकजण खूप पसंत करत आहेत. (व्ह्यूज- 86 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्यार होता-होता पहली बार : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटातील 'प्यार होता-होता पहली बार' हे गाणं देखील हिट झालं आहे. या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. (व्ह्यूज- 113 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

फिर और क्या चाहिए : हिंदी चित्रपट सृष्टीचा अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील 'फिर और क्या चाहिये' हे गाणं आजही ऐकायला मिळत आहे. हे गाणं अरिजित सिंगनं गायलं आहे. (व्ह्यूज- 221 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

तेरे वास्ते : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील 'तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा' हे दुसरं गाणं 2023 च्या हिट गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे. या गाण्यासाठी अरिजित सिंगनं आवाज दिला आहे. (व्ह्यूज- 86 दशलक्ष )

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चलैया : 'पठान' चित्रपटातून पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खाननं 'जवान' या चित्रपटातून आणखी मोठा बॉक्स ऑफिसवर धमाका केला. या चित्रपटातील 'चलैया' हे गाणं खूप गाजलं. या गाण्यावर अनेकांनी सोशल मीडियावर रील्स तयार केले आहेत. (व्ह्यूज- 254 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जिंदा बंदा : अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये 'जवान'चे 'जिंदा बंदा' हे गाणंही लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामधील शाहरुख खानचा दमदार डान्स त्याच्या चाहत्यांना खूप आवडला होता. या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिलं आहे. (व्ह्यूज- 98 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हीरिए-हीरिए : 2023 मध्ये आणखी एक व्हिडिओ अल्बम 'हीरिए' प्रचंड गाजला आहे. यातील प्रेम-रोमँटिक गाणं जसलीन रॉयल आणि अरिजित सिंग यांनी एकत्र गायलं आहे. या गाण्यात जसलीननं स्वत: अभिनय केला असून तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमान दिसत आहे. (व्ह्यूज- 233 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

झूमे जो पठाण : शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण'नं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. या चित्रपटातील 'झुमे जो पठाण' हे गाणं खूप गाजलं. हे गाणं अरिजित आणि सुकृती कक्कर यांनी गायलं आहे. या गाण्याला विशाल-शेखर या हिट संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलय. (व्ह्यूज-786 दशलक्ष)

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. जॅकी श्रॉफ स्टारर 'हिरो' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण
  2. किंग खानची सद्दी संपली? देशांतर्गत 'डंकी'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, धक्कादायक अहवाल आला समोर
  3. अबराम खाननं त्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ दिली ; चाहत्यांनी केलं कौतुक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.