ETV Bharat / entertainment

अबराम खाननं त्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ दिली ; चाहत्यांनी केलं कौतुक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 12:31 PM IST

Abram khan Viral video : अभिनेता शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खानच्या शाळेत नुकतंच वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात त्यानं स्टेजवर वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ दिली.

Abram khan Viral video
अबराम खानचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई - Abram khan Viral video : अभिनेता शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान हा कायम चर्चेत असतो. अबराम हा मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असून काल संध्याकाळी त्याच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वार्षिक कार्यक्रमात अबरामने परफॉर्म केलं. सध्या सोशल मीडियावर अबराम खानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो अभिनय करताना दिसतोय. अबरामनं या परफॉर्मन्समध्ये वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ केली. त्यानंतर आता अनेक चाहते अबरामचे कौतुक करत असून त्याला त्याच्या वडिलांसारखा जबरदस्त सुप्परस्टार बनणार असल्याचं प्रशस्तीपत्रक देत आहेत.

अबराम खान व्हायरल व्हिडिओ : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमामधील व्हिडिओ अनेकांना खूप आवडले आहेत. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या शाळेत अनेक स्टार्सची मुलं शिकतात, त्यात शाहरुख खानचा मुलगा अबराम खानचा देखील समावेश आहे. अबरामनं वार्षिक फंक्शनमध्ये एका नाटिकेत अभिनय केला. यादरम्यान त्यानं वडील शाहरुखप्रमाणे (मोकळ्या हाताची) सिग्नेचर पोझ दिली. या कार्यक्रमाला शाहरुख खानसोबत गौरी खान आणि सुहाना खाननेही हजेरी लावली होती. सोशल मीडियावर अबराम खान ट्रेंड करत आहे.

अबराम खानची सिग्नेचर पोझ : अबराम खानच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं , ''अबराम तू नक्कीच तुझ्या वडिलांसारखा अभिनेता होणार''. दुसऱ्या एकानं लिहिलं, अबराम तू सुहाना खानपेक्षा चांगला अभिनय केला आहे, या लूकमध्ये तू सुंदर दिसत आहे''. आणखी एकानं लिहिलं, ''अबराम, मला तूझा अभिनय खूप चांगला वाटला, तूझी सिग्नेचर पोझ ही विशेष आहे''. अशा अनेक कमेंटस् या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांचा अबराम खान हा लहान मुलगा आहे. अबरामचा जन्म 2013 मध्ये सरोगसीमार्फत झाला होता. दरम्यान शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं तर, तो 'डंकी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. यानंतर किंग खान 'टायगर वर्सेस पठाण'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यात अडथळा कायम, दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार
  2. 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' फेम गायक अनूप घोषाल यांचं निधन, ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  3. "मी दारु पीत नाही", म्हणत सनी देओलनं सांगितलं निर्व्यसनी असल्याचं कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.