ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नाच्या 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:59 PM IST

Rashmika Mandannas next film : रश्मिका मंदान्नानं तिच्या कारकिर्दीतील 24 व्या चित्रपटाला सुरुवात केली आहे. 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या निर्मितीची हैदराबादमध्ये सुरुवात झाली. राहुल रवींद्रन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक अनोखी प्रेम कथा आहे.

The Girlfriend Shooting Moment
द गर्लफ्रेंड शूटिंग मूहुर्त

हैदराबाद - Rashmika Mandannas next film : रश्मिका मंदान्नानं तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात केली आहे. 'द गर्लफ्रेंड' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा मूहुर्त करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद, एसकेएन, दिग्दर्शक साई राजेश, मारुती, पवन सदिनेनी आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती.

अल्लू अरविंद यांनी क्लॅप देऊन शुटिंगला सुरुवात केली. यावेळी स्क्रिप्ट दिग्दर्शकाच्या हाती देत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रश्मिका मंदान्नाचा हा 24 वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती. या चित्रपटातील तिचा लूकही यावेळी प्रसिद्ध करण्यात आला होता.

ऑक्टोबरमध्ये गर्लफ्रेंड चित्रपटाचं लॉन्च करताना इन्स्टाग्रामवर लिहिले होते, "हे जग महान प्रेमकथांनी भरलेले आहे, परंतु अशा काही प्रेमकथा आहेत ज्या यापूर्वी ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्याही नाहीत आणि यापैकीचं एक आहे 'द गर्लफ्रेंड'."

रश्मिकाच्या पात्राची एक झलक देखील यावेळी दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये ती पाण्याखाली श्वास घेत असल्याचे दिसते. ती तणावग्रस्त दिसत असताना, एक क्षण असा येतो जेव्हा तिचा श्वास सुटतो. राहुल रवींद्रन हा या अनोख्या प्रेमकथेचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तर या चित्रपटाला श्रीनिवास कुमार नायडू, विद्या कोप्पिनेदी आणि धीरज मोगिलेनी यांनी फायनान्स केला आहे. अल्लू अरविंद हे गीता आर्ट्स बॅनरखाली हा चित्रपट सादर करत आहेत. या चित्रपटाचे संगीतकार हेशम अब्दुल वहाब असणार आहेत.

रश्मिका मंदान्ना ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. द गर्लफ्रेंड रिलीज होण्यापूर्वी तिचा संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित अ‍ॅनिमल हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत भूमिका साकारत आहे. रश्मिकासोबत या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि सुरेश ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात रश्मिकाने गीतांजली ही व्यक्तिरेखा साकारली आहे. याव्यतिरिक्त रश्मिका पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. शाकुंतलम फेम देव मोहन यांच्यासोबत रेनबो आणि विजय देवराकोंडाच्यासोबतही एका चित्रपटातकाम करणार आहे.

हेही वाचा -

  1. 'टायगर 3'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'ब्रह्मास्त्र'ला टाकले मागे

2. 'कल हो ना हो'च्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते वडिलांची उपस्थिती, करण जोहरची भावनिक पोस्ट

3. फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात केलं दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.