ETV Bharat / entertainment

Award of honor to Rishabh Shetty : ऋषभ शेट्टीने जिंकला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार

author img

By

Published : Feb 15, 2023, 3:50 PM IST

Award of honor to Rishabh Shetty
Award of honor to Rishabh Shetty

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'कंतारा'च्या यशानंतर अभिनेता ऋषभ शेट्टीची मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर कॅटेगरीत घोषणा करण्यात आली आहे. कन्नड अभिनेता यश आणि सुदीपनंतर हा पुरस्कार मिळवणारा ऋषभ शेट्टी हा तिसरा कन्नड स्टार आहे.

मुंबई - आपल्या रांगड्या अभिनयाने संपूर्ण देशातील सिनेप्रेमींना आकर्षित करणारा अभिनेता ऋषभ शेट्टी हा नव्या पुरस्कारामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झालेला 'कंतारा' हा चित्रपट ऋषभला चांगलाच यशदायी ठरला होता. कंतारामुळे कर्नाटकपुरता मर्यादित असलेला हा अभिनेता आता अखंड भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. भारतातील इतर व परभाषिक समुदायाकडून खूप कौतुक आणि मान्यता मिळालेल्या ऋषभला आता आणखी एक सन्मान प्राप्त झाला आहे.

दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'कंतारा'च्या यशानंतर अभिनेता ऋषभची मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर कॅटेगरीत घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारे याची घोषणा केली आहे.

हा दादासाहेब फाळके पुरस्कार केंद्राचा नाही - २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतील ताज लँड अँड हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार असून त्यात हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रातील व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार एकूण 28 श्रेणींमध्ये दिला जातो. तसे, दादासाहेब फाळके अवॉर्ड फाउंडेशन या पुरस्काराचे वितरण करणार असून हा केंद्र सरकारचा पुरस्कार नाही. केंद्र सरकारच्या वतीने सिनेक्षेत्रात अतुनीय कामगिरी केलेल्या दिग्गज व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार म्हणून बहाल केला जातो. भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार हाच सर्वोच्च आहे, त्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून हा खुलासा.

यश, किच्चा सुदीप यांनाही मिळाला आहे हा पुरस्कार - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या नावाने केंद्र सरकार सर्वात मोठा पुरस्कार देत असते. तो हा पुरस्कार नसला तरी इतर काही चित्रपट महोत्सवांमध्ये फाळके यांच्या नावावर पुरस्कार दिला जातो. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा त्यापैकीच एक असून दरवर्षी अनेक कलागुणांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. 2019 मध्ये, यशला KGF चॅप्टर 1 मधील कामगिरीसाठी दादा साहेब फाळके दक्षिण पुरस्कार मिळाला. त्यानंतर, 2020 मध्ये किच्चा सुदीपला दबंग 3 मधील अभिनयासाठी मोस्ट प्रॉमिसिंगअ‍ॅक्टर कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. यावेळीच्या पुरस्कार यादीत ऋषभनेही हा पुरस्कार पटकावला.

या चित्रपट महोत्सवाबद्दल थोडेसे - दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (डीपीआयएफएफ) ची स्थापना २०१२ मध्ये झाली असली तरी २०१६ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे धुंडीराज गोविंद फाळके यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भारताचा एकमेव स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे.

हेही वाचा - Aditya Chopra on Nepotism : उदय चोप्राला स्टार बनवू शकलो नाही, भाऊ आदित्य चोप्राची खंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.