ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनचा आलिया भट्टच्या कास्टिंगला होता विरोध, करण जोहरचा खुलासा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 3:36 PM IST

KWK 8 : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात आलिया भट्टच्या कास्टिंगच्या विरोधात असल्याचा खुलासा, करण जोहरनं त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन 8मध्ये केला आहे. या शोमध्ये या स्टार्सनी खूप मजा मस्ती केली आहे.

KWK 8
कॉफी विथ करण सीझन 8

मुंबई - KWK 8 : चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या टॉक शो 'कॉफी विथ करण'साठी देखील चर्चेत असतो. करण सध्या 'कॉफी विथ करण'चा 8वा सीझन होस्ट करत आहे. यावेळी करण जोहरच्या या शोमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाची स्टार कास्ट सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन आले होते. 'कॉफी विथ करण सीझन 8' या शोचा 5 वा एपिसोड डिस्ने प्लस हॉट स्टारवर आज प्रसारित होणार आहे. दरम्यान या शोमध्ये वरुण आणि सिद्धार्थनं त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात आलिया भट्टच्या कास्टिंगच्या विरोधात सिद्धार्थ आणि वरुण होते, असं आता उघडकीस आलं आहे.

वरुण-सिद्धार्थ आलियाच्या कास्टिंगच्या विरोधात : वरुण आणि सिद्धार्थनं 2012 मध्ये करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलिया भट्टसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता 'कॉफी विथ करण'मध्ये दिसलेल्या या दोन कलाकारांबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. करण जोहरनं सांगितले, की 'सिद्धार्थ आणि वरुणला चित्रपटात आलिया भट्टला कास्ट करू द्यायचं नव्हतं. पुढं त्यानं म्हटलं, 'मला अजूनही आठवतंय की आलिया भट्ट पहिल्यांदा आमच्यासमोर आली तेव्हा तुम्हा दोघांनी मला मेसेज केला होता, की तुम्ही तिला चित्रपटात कास्ट करू शकत नाही. तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हटलं होत की ती खूपच यंग दिसत आहे. पण जेव्हा आम्ही तीन महिन्यांनी फोटोशूट केले, तेव्हा आलिया खूप शांतपणे उभी होती. तिनं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही दोघेही मला आधीच ओळखत होते, पण ती मला अजिबात ओळखत नव्हती. जेव्हा तिनं पहिला शॉट दिला तेव्हा, तेव्हा तिला कास्ट करण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. असं मला समजलं'

सिद्धार्थ आणि वरुणचं वर्कफ्रंट : सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'मिशन मजनू' चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसला होता. त्याचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तो गृप्तहेराचा भूमिकेत दिसला होता. याशिवाय सिद्धार्थ हा 'योद्धा' चित्रपटामुळं सध्या चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट ' 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'रणभूमी', 'मिस्टर लेले' आणि 'भेडिया 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. अगस्त्य नंदानं कथित गर्लफ्रेंड सुहानसोबत कापला वाढदिवसाचा केक, व्हिडिओ व्हायरल
  2. सलमान खानची भाची अलीझेह अग्निहोत्रीच्या डेब्यू चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग
  3. उत्तर माहित असूनही 1 कोटीचा प्रश्न चुकीचा खेळला 8 वर्षाचा विराट अय्यर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.