ETV Bharat / entertainment

Jab we met sequel: 'जब वी मेट' चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 12:40 PM IST

Jab we met sequel: करीना कपूर खान आणि शाहिद कपूर स्टारर 'जब वी मेट' या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या चित्रपटाबद्दल अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरीही या चित्रपटाबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Jab we met sequel
जब वी मेट सीक्वल

मुंबई - Jab we met sequel: करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचा 'जब वी मेट' चित्रपट रूपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर झाला होता. 2007 मध्ये रिलीज झालेला हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट खूप गाजला आणि अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. चाहत्यांनी अनेकदा या चित्रपटाची मागणी केली होती. शेवटी आता 'जब वी मेट'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'जब वी मेट 2'ची योजना लवकरच आखली जाणार आहे. 'जब वी मेट 2' बाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा ही लवकरच होऊ शकते. या चित्रपटामध्ये करीना कपूर खान आणि शाहिद कपूर एकत्र दिसतील की नाही यावर अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.

'जब वी मेट'चा सीक्वल : 'जब वी मेट' या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा शाहिद कपूरनं या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल बोलत सिद्धार्थ कन्ननला सांगितलं होतं, हे खरोखरच त्या स्क्रिप्टच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, म्हणून जर एखादी स्क्रिप्ट चांगली आहे जी, सीक्वलची मागणी करते आणि ही अशी एक स्क्रिप्ट आहे जी तुम्ही वाचून म्हणाल की ही स्क्रिप्ट चांगली आहे. ही स्क्रिप्ट जर मूळ स्क्रिप्टशी जुळत असेल' तर मी ते करेन, मी फक्त मूळ वस्तूचे ब्रँड मूल्य शोधत आहे जे मी वापरण्याचा प्रयत्न करेल, असं या चित्रपटाबाबत बोलताना शाहिदनं सांगितलं.

शाहिद कपूरनं केलं करिनाचं कौतुक : या चित्रपटाबद्दल बोलताना शाहिद कपूरनं करिनाच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं होतं की, 'गीत'नं ज्या प्रकारे काम केलं, ते इतर कोणत्याही अभिनेत्रीनं केलं नसतं, मी माझ्या भूमिकेवर भाष्य करू शकत नाही. 'जब वी मेट' या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली होती. या चित्रपटामधील गीत आणि आदित्यची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. 'जब वी मेट' चित्रपटाची प्रेम कहाणी खूप हटके असल्यानं हा चित्रपट 2007चा हिट होता. या चित्रपटाबद्दल आता सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. Shah Rukh Khan Deepika Padukone : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा व्हिडिओ झाला व्हायरल...
  2. Jaane Jaan promotion :'जाने जान' प्रमोशनमध्ये पिवळ्या लिंबू साडीसह करीनानं प्रेक्षकांना केलं घायाळ
  3. Ganesh festival 2023 : बाप्पाच्या आगमनासाठी कंगना रणौतचा उत्साह शिगेला, शेअर केला उत्सवी व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.