Ganesh festival 2023 : बाप्पाच्या आगमनासाठी कंगना रणौतचा उत्साह शिगेला, शेअर केला उत्सवी व्हिडिओ

Ganesh festival 2023 : बाप्पाच्या आगमनासाठी कंगना रणौतचा उत्साह शिगेला, शेअर केला उत्सवी व्हिडिओ
Ganesh festival 2023 : गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने अभिनेत्री कंगना रणौतला आपला उत्साह आवरणे कठीण जात आहे. तिने गणेश उत्सवातील एक उत्साही व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे.
मुंबई - Ganesh festival 2023 : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थी सणासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी कंगनाने आपल्या सोशल मीडियावर गणेश चतुर्थीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. श्रीगणरायाच्या आगमनासाठी अभिनेत्री कंगना आतुर झाली असून हा सण साजरा करण्यास उत्सुक आहे.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करताना, कंगनाने लिहिले, 'कोविड आणि स्वाइन फ्लू क्रॉस व्हेरिएंटने गाठल्याच्या एक आठवड्यानंतर मला याचं खूप हसू येतं. आगामी सणासाठी मी खूप उत्सुक झाली आहे.'
कंगनाचा हा व्हिडिओ मुंबईतील एका फोटोग्राफरने शेअर केला आहे. हा जुना व्हिडिओ मुंबईच्या खेतवाडीचा राजा गणपती उत्सवातील आहे. यात आपण गणेशाची एक भव्य मूर्ती पाहू शकतो. त्यासमोर एक मोठा पडदा बांधण्यात आला असून काऊंट डाऊन सुरु होते आणि हा पडदा हटवला जातो. समोर मोठ्या संख्येने लोक गणेश मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये शूट करण्यासाठी सज्ज असतात. अखेर गणपत्ती बाप्पाचा जयजयकार होतो आणि गणेशाचे दर्शन होते. यावेळी मोठी आतिषबाजीही झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.
या वर्षीची गणेश चतुर्थी कंगना रणौतसाठी अधिक महत्त्वाची आहे कारण तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट चंद्रमुखी 2 त्या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असणार आहे. हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे तो आता 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत आणि राघव लॉरेन्स यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दरवर्षी, अनेक बॉलिवूड कलाकार गणपतीची मूर्ती घरी आणून आणि शुभेच्छा आणि समृद्धीसाठी प्रार्थना करून गणेश उत्सव साजरा करतात. गेल्या वर्षी अक्षय कुमार, आलिया भट्ट, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, एकता कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हा सण उत्साहाने साजरा केला होता.
कामाच्या पातळीवर, कंगना रणौतचे या वर्षी दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. अभिनेता सर्वेश मेवारा दिग्दर्शित 'तेजस' या चित्रपटात ती झळकणार आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर टायगर श्रॉफच्या गणपथ चित्रपटासोबत होणार आहे. ती स्वत: दिग्दर्शन करत असलेल्या इमर्जन्सीमध्येही इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा -
