ETV Bharat / entertainment

Gadar 2 Collection Day 4 : 'गदर २' चित्रपटाने चौथ्या दिवशी 'इतकी' केली कमाई....

author img

By

Published : Aug 15, 2023, 3:32 PM IST

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालत आहे. गदर २' चित्रपटाने पहिल्या सोमवारी चांगलीच कमाई केली आहे.

Gadar 2
गदर २

मुंबई : सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गदर २' चित्रपटाने खरोखरच रूपेरी पडद्यावर वादळ निर्माण केले आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यासह हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सातत्याने विक्रम मोडत आहे. 'गदर २' चित्रपटाचा ओपनिंग वीकेंड उत्कृष्ट होता, तर 'गदर २' या चित्रपटाने आठवड्याच्या दिवसातही भरपूर नोट्स छापल्या आहेत. सोमवारी, या चित्रपटाने शाहरुख खानच्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणचा विक्रमही मोडला आहे. चित्रपटाची लोकांमध्ये असलेली क्रेझ अनेक चित्रपटगृहांमध्येही दिसून येत आहे. चला जाणून घेऊया 'गदर २'ने सोमवारी किती केली कमाई...

'गदर २ची एकूण कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'गदर २' चित्रपट इतिहास रचताना दिसत आहे. या चित्रपटाने ४ दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. 'गदर २' चित्रपटाने चौथ्या दिवशी तब्बल ३८.७ कोटींची कमाई केली आहे, याआधी क्वचितच सोमवारी अशी कमाई चित्रपटांची झाली आहे. हा चित्रपट आता झपाट्याने बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी ४०.१ कोटी, दुसऱ्या दिवशी ४३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी रविवारी ५१.७ कोटी आणि चौथ्या दिवशी सोमवारी ३८.७ कोटी कमावले आहे. या चित्रपटाने चार दिवसांत एकूण १७३.५८ कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. रविवारपर्यंत या चित्रपटाने जगभरात २३० कोटींची कमाई केली होती.

'गदर २' स्वातंत्र्यदिनी २०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याची अपेक्षा : 'गदर २'च्या कमाईचा वेग पाहता, स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जबरदस्त कलेक्शन करू शकते अशी अपेक्षा केली जात आहे. 'गदर २' आता बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ टिकणारा चित्रपट दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारले आहे. बॉक्स ऑफिसवर असा उत्साह दीर्घकाळानंतर आला आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप मोठी उंची गाठू शकतो. 'गदर २' हा चित्रपट २००१मध्ये आलेला 'गदर'चा सीक्वल आहे आणि पहिल्या भागाप्रमाणेच हा एक मोठा ब्लॉकबस्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडील प्रेम आणि शत्रुत्व सुंदरपणे दाखवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून देत आहेत.

हेही वाचा :

  1. Superstar Rajinikanth Jailer : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने जगभरात केला ३५० कोटीचा आकडा...
  2. Akshay Kumar News : स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली 'ही' माहिती, ट्रोलरची केली बंद
  3. Omg 2 box office collection day 4 : 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा केला पार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.