ETV Bharat / entertainment

'डंकी' चित्रपटामधील पहिलं गाणं 'लूट टूट' लवकरच होणार रिलीज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 7:06 PM IST

शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं 'लूट टूट' आज रिलीज होण्याची शक्यता आहे.

Dunki First Song Loot Toot
डंकी पहिले गाणे 'लूट टूट'

मुंबई - Dunki First Song Loot Toot : शाहरुख खाननं या वर्षात 'पठाण' आणि 'जवान' असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान किंग खानचा आगामी चित्रपट 'डंकी' लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर हा शाहरुखच्या चाहत्यांना खूप आवडला, त्यामुळं या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. 20 नोव्हेंबर रोजी 'डिंकी'चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 61 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटातील पहिलं गाणं आज 'लूट टूट' आज रिलीज होण्याची शक्यता आहे.

शाहरुख खान डंकी गाणं: 'डंकी'मधील पहिल्या गाण्याची प्रतिक्षा प्रत्येकजण करत आहेत. या चित्रपटातील गाण्याला किंग खान रिलीज करणार आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहे मुन्नाभाई', '3 इडियट्स', 'पीके' आणि 'संजू'यांसारख्या या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक राज कुमार हिरानी केले असून त्यांनी पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत काम केलं आहे. 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटासाठी राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानला मुन्नाभाईची भूमिका ऑफर केली होती. मात्र किंग खानला उपचारासाठी लंडनला जावे लागले त्यामुळं तो ही भूमिका करू शकला नाही. आता 20 वर्षांनंतर 'डंकी' या चित्रपटाद्वारे शाहरुख आणि राजकुमार हिरानी एकत्र आले आहेत.

'डंकी' चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'पठाण' 'जवान' आणि 'टायगर 3' नंतर आता ज्या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे, तो म्हणजे शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड 'डंकी' चित्रपट आहे. आतापर्यंत या सिनेमाचा 'टीझर ड्रॉप 1' आणि पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. 'डंकी'ची कहाणी परदेशात जाणाऱ्या आणि चार मित्रांभोवती फिरणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आधीच रिलीज झाले आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान आणि त्याच्या चार मित्रांची टोळी दिसत आहे. 'डंकी' चित्रपटात किंग खान हार्डीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर 'लिओ'ची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली
  2. नील भट्टनं केली अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; जाणून घ्या विकी जैनचं रहस्य
  3. 'तुम बिन' फेम प्रियांशू चॅटर्जीचा 'हटके' फोटो सोशल मीडियावर व्हायरल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.