थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर 'लिओ'ची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली

थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर 'लिओ'ची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली
Leo will arrive on OTT : लोकेश कनागराज दिग्दर्शित 'लिओ' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालंय. दक्षिण भारतातील चार भाषांसह हा चित्रपट हिंदीतही रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते ओटीटी रिलीजसाठी करत होते. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली आहे.
मुंबई - Leo will arrive on OTT : थलपथी विजयचा अलिकडे 'लिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग जाईंटवर प्रसारित होणार आहे. सोमवारी एक घोषणा करताना नेटफ्लिक्सनं म्हटलंय की, संपूर्ण भारत आणि जागतिक प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेला 'जिओ' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेत पदार्पण करणार आहे.
'लिओ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत चार आठवड्यांच्या थिएटर रिलीजनंतर ओटीटीसाठी किफायतशीर करार केला आहे, या निर्णयामुळे त्यांना हिंदी राष्ट्रीय प्लेक्सेसमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास टाळावं लागणार आहे. थिएटर आणि ओटीटी रिलीज दरम्यान सहा आठवड्यांच्या अंतराचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी भारतात नेटफ्लिक्सवर दाखल होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी जागतिक ओटीटी रिलीज होणार आहे.
लोकेश कनगराज दिग्दर्शित लिओ हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झाल्यानंतर थिएटरमध्ये जबरदस्त यश मिळालं. या अॅक्शन-पॅक्ड हिट चित्रपटाला जागतिक स्तरावर 600 कोटींचा गल्ला जमवता आला. या चित्रपटानं तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आणि हिंदी भाषेतील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
'लिओ' चित्रपटाचं कथानक थिओगमध्ये आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या आणि प्राणी वाचवणाऱ्या एका कॅफेच्या मालकाभोवती फिरते. दुर्दैवी घटनांच्या मालिकेने त्याला एका धोकादायक ड्रग कार्टेलच्या क्रॉसहेअरमध्ये ढकलण्यात येते. त्यानंतर एक थरारक गोष्ट पडद्यावर घडताना दिसते. जॉन वॅग्नरच्या "अ हिस्ट्री ऑफ व्हायोलेन्स" या ग्राफिक कादंबरीपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन, त्रिशा, गौतम वासुदेव मेनन, मायस्किन, मॅडोना सेबॅस्टियन, जॉर्ज मेरीन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि मॅथ्यू थॉमस आणि थलपती विजय याच्यासह अनेक कलाकार आहेत.
दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांच्यासोबत चित्रपटाचे सह-लेखन केले आहे. लिओ चित्रपटाची निर्मिती एस.एस. ललित कुमार आणि जगदीश पलानीसामी यांनी केली आहे. या चित्रपटाची प्रतीक्ष देशातील अनेक छोट्या शहरातील प्रेक्षक करत आहेत. त्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहता आला नव्हता. त्यामुळे 'लिओ' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा सुरू होती.
हेही वाचा -
