ETV Bharat / entertainment

boyz 4 Ye Na Raani song out : 'बॉईज 4' चित्रपटामधील 'ये ना राणी’ हे धमाल गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 10:16 AM IST

boyz 4 Ye Na Raani song out : 'बॉईज 4' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटामधील गाणं 'ये ना राणी’ हे रिलीज झालंय. या गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.

boyz 4 Ye Na Raani song out
बॉईज 4 ये ना राणी गाणं रिलीज

मुंबई - boyz 4 Ye Na Raani song out : सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलंय. 'बॉईज'च्या विनोदी ढंगाच्या सिरीजनं रुपेरी पडद्यावर खूप धमाल केली आहे. बॉईज 3'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज 4' धमाका करण्यासाठी येत्या 20 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॅाईज’ सिरीजमधील सर्वच गाणी खूप जोरदार आहेत. या सिरीजमधील गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता 'बॉईज 4'कडून त्याच अपेक्षा केल्या जात आहे. दरम्यान आता ‘बॅाईज 4’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे 'ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्याला अनेकजण पसंत करताहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बॉईज 4'मधील गाणं रिलीज : 'ये ना राणी’ हे गाणं युट्युबवर प्रदर्शित करण्यात आलंय. या गाण्याच्या कमेंट विभागात अनेक कमेंट करून प्रेक्षक गाण्याचं आणि चित्रपटाचे कौतुक करत आहे. आतापर्यंत 'बॉईज'च्या तिन्ही पार्टला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. आता 'बॉईज 4'ला चाहते खूप प्रेम देतील ही अपेक्षा केली जात आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. या गाण्याला वैशाली सामंतनं आवाज दिला असून राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे.

'बॉईज 4' चित्रपटाबद्दल : गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, 'बॉईज 4' मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असाच प्रतिसाद 'ये ना राणी’ला मिळेल, आताच्या धकाधकीच्या जीवनात मूड फ्रेश करणारे हे गाणे आहे. तरूणाईला हे गाणे विशेष आवडणारे आहे. गाणं जरी भन्नाट असलं तरी या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनही तितकेच भारी आहे. मुळात हे गाणे करताना आम्हीही खूप धमाल केलीय. मुलांनीही हे गाणे खूप एन्जॅाय केलंय त्यामुळे मला खात्री आहे, संगीतप्रेमींना हे गाणं तितकंच आवडंल.' सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. Vishnudas Bhave Gaurav Padak Award : प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
  2. National Film Awards Ceremony २०२३ : 'दादासाहेब फाळके पुरस्कार' स्वीकारताना वहिदा रहमान भावूक
  3. National Film Awards 69th ceremony: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अल्लु अर्जुन आणि आलिया भट्टचा सन्मान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.