ETV Bharat / entertainment

National Film Awards Ceremony २०२३ : 'दादासाहेब फाळके पुरस्कार' स्वीकारताना वहिदा रहमान भावूक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 5:37 PM IST

Updated : Oct 17, 2023, 6:14 PM IST

National Film Awards Ceremony २०२३ : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना समर्पित केला आहे.

National Film Awards Ceremony 2023
वहिदा रहमान यांना प्रतिष्ठित दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान

वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : National Film Awards Ceremony २०२३ : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. त्या पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्या तेव्हा उपस्थित समस्त दिग्गज प्रेक्षकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केलं. हा पुरस्कार त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना समर्पित केला आहे. त्यांची चित्रपट कारकिर्द जवळपास सात दशकांची आहे. खामोशी, गाईड आणि कागज के फूल यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगावर अमिट छाप सोडली होती.

वहिदा रहमान यांची प्रतिक्रिया : दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर वहिदा रहमान म्हणाल्या, 'दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी माझा अनुराग ठाकूर आणि सर्व ज्युरी मेंबर्सनी विचार केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप आभारी आहे. आज अशा जागी उभे आहे हे सर्व माझ्या प्रिय फिल्म इंडस्ट्रीमुळे शक्य झालंय. माझ्या नशिबानं मला दिग्गज निर्माते, लेखक, संवाद लेखक, संगीतकार या सर्वांची मला खूप मदत झाली. मेकअपमन, हेअर ड्रेसर आणि वेशभूषा करणारे यांचाही आम्हाला घडवण्यात मोठा हातभार असतो. त्यामुळे हा पुरस्कार मी फिल्म इंडस्ट्रीतील सर्व विभागांना समर्पित करत आहे.'

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित : वहिदा रहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी नेहमीच गौरव आणि प्रशंसा केली आहे. 'रेश्मा और शेरा' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. वहिदा रहमान यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान झाल्यानंतर त्या खूप भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

तेलुगू चित्रपटापासून सुरुवात : वहिदा रहमान यांचा सिनेमा जगतातील प्रवास 1955 मध्ये तेलुगू चित्रपट 'रोजुलु मरायी' चित्रपटापासून सुरू झाला. प्रख्यात चित्रपट निर्माते गुरु दत्त यांच्या सहवासाने चित्रपट उद्योगातील त्यांचा दर्जा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोमँटिक क्लासिक चित्रपट 'प्यासा' (1957) आणि 'कागज के फूल' (1959), संगीतमय रोमान्स चौहदवी का चांद (1960), आणि 'साहिब बीबी और गुलाम' (1962) अशा त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. विशेष म्हणजे, 'गाइड' (1965) चित्रपटामधील अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा -

  1. National Film Awards 69th Ceremony: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अल्लु अर्जुन आणि आलिया भट्टचा सन्मान
  2. Tiger 3: 'टायगर 3'मधील इमरान हाश्मीचा फर्स्ट लूक आला समोर; पहा पोस्टर...
  3. Disha Patani : दिशा पटानीचा मुंबई विमानतळावरील बोल्ड लूकचा व्हिडिओ झाला व्हायरल ; पहा व्हिडिओ...
Last Updated :Oct 17, 2023, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.