ETV Bharat / entertainment

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

author img

By

Published : Aug 21, 2023, 4:07 PM IST

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या डोक्यावरून वडिलांची सावली दूर झाली आहे.

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी हा दु:खात आहे. पंकज त्रिपाठीचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठीच्या वडिलांनी त्यांच्या मूळ गावी बेलसंडमध्ये अखेरचा श्वास घेवून जगाचा निरोप घेतला. पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना धक्का बसला आहे. मात्र, पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन कसे झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पंकज त्रिपाठीचे वडील आणि आई राहत होते गावात : मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी हे बिहारमधील गोपालगंज भागातील मूळ रहिवासी आहेत. आपल्या करिअरमुळे पंकज त्रिपाठी पत्नी आणि मुलांसह मुंबईतील मढ आयलंड परिसरात राहतात. पंकज त्रिपाठीचे वडील आणि आई गावातच राहत होते. पंकज त्रिपाठीनं संवादात सांगितलं होतं की, त्याच्या वडिलांना चित्रपटांमध्ये अजिबातचं रस नाही. त्यांचा मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो हेही त्यांना माहीत नाही.

पंकज त्रिपाठीला बनायचे होते डॉक्टर : पंकज त्रिपाठी काही काळापूर्वी बिहारमधील त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी कुटुंबासोबत बराच वेळ घालवला होता. त्यावेळी पंकज त्रिपाठीने आई आणि वडिलांसाठी घरात टीव्हीही लावला होता. एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीने सांगितले होते की, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या मुलानं शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावं. तसेच पंकज त्रिपाठीला त्याच्या आईची खूप साथ मिळाली.

पंकजचे वडील एकदाच मुंबईत आले : पंकज त्रिपाठीने एका मुलाखतीदरम्यान आपल्या वडिलांचा संदर्भ देत सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांनी कधी थिएटरही पाहिले नव्हते. पुढे त्यांनी म्हटले होते की, त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. मुंबईतील मोठमोठी घरे, इमारती वडिलांना आवडत नव्हत्या. दरम्यान आता पंकज त्रिपाठी हे रात्री ११ वाजेपर्यंत त्यांच्या गावी पोहोचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 box office collection day 10: 'ओह माय गॉड २'ने बॉक्स ऑफिसवर पार केला १०० कोटींचा टप्पा...
  2. Bhumika chawla birthday special : 'या' चित्रपटाने भूमिका चावलाला दिली प्रसिद्धी ; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिचा प्रवास...
  3. Gadar 2 Box Office Collection Day 10: सनी देओल स्टारर 'गदर २' हा लवकरच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा करेल पार...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.