ETV Bharat / entertainment

bheed Trailer Released : भिड ट्रेलर रिलीज, कोविड लॉकडाऊनची खरी आणि भयावह कथा

author img

By

Published : Mar 10, 2023, 12:28 PM IST

bheed Trailer Released
भिड ट्रेलर रिलीज

Bheed Trailer Release: जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या प्राणघातक कोरोना व्हायरसमध्ये अनेकांचा कोरोना होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. देशव्यापी लॉकडाऊनमुळे भुकेने आणि तहानने लोकांचे प्राण गेले तेव्हा हे भयानक दृश्य पाहायला मिळाले. या विषयावर आधारित अनुभव सिन्हा यांनी भिड हा चित्रपट बनवला असून याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

मुंबई - चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एक वास्तववादी कटूसत्य लोकांसमोर मांडणार आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळातील प्रदीर्घ लॉकडाऊन आणि त्यातील लोकांच्या दुरवस्थेवर एक चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटात दिग्दर्शकाने राजकुमार रावला मुख्य अभिनेता आणि उत्तम अभिनेत्री भूमी पेडणेकर यांना कलाकार म्हणून निवडले आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून आता या चित्रपटाचा ट्रेलर १० मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाचा ट्रेलर खूपच हृदयस्पर्शी आहे आणि त्यातील प्रत्येक दृश्य सत्याची जाणीव करुन देत आहे. देश आणि जगाने पाहिलेला लॉकडाऊनचा तो काळ लोक कधीच विसरू शकणार नाही. एवढेच आपण या ट्रेलरमध्ये पाहू शकतो. सुमारे अडीच मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये लॉकडाऊनच्या त्या बाजूवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या लोकांवर प्रशासनाचे अत्याचार होत आहेत. तर दुसरीकडे नेते आणि पोलीस आपापल्या अधिकारामुळे एकमेकांना गुंडगिरी करताना दिसतात.

ट्रेलरमध्ये पोलिस आणि राजकारणी कसे काम करत होते, यावरही पडदा टाकण्यात आला आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होत आहे. 22 मार्च 2020 हा दिवस आहे जेव्हा देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता आणि कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशाला सतर्क करण्यात आले होते. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लॉकडाऊन वाढवण्याची माहिती देण्यासाठी टीव्हीवर झळकले, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोक रस्त्यावर आले. ही स्थिती देशभर दिसून आली. घरदार सोडून परराज्यांत कमावायला निघालेल्या लोकांची ही दृश्य होती. प्रवासी मजूर असलेल्या कष्टकरी लोकांना आपल्या राज्यात परतण्यासाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या, लोक सायकलवरुन, चालत, जसे जमेल त्या मार्गाने प्रवास करत होते. अनेकांना तर कोरोना न होत्याच मृत्यूने गाठले. यातील अनेक वास्तववादी प्रसंग अनुभव सिन्हा यांनी चितारले आहेत.

चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्याशिवाय पंकज कपूर, आशुतोष राणा आणि सीआयडी फेम आदित्य श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - Deepika Padukone : ऑस्कर सोहळ्यासाठी दीपिका पदुकोण अमेरिकेला रवाना; ज्युरी सदस्य म्हणून सामील होण्याची संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.