ETV Bharat / entertainment

"अ‍ॅनिमल हिंदी सिनेमासाठी गेम चेंजर" म्हणत, संदीप रेड्डी वंगाच्या समर्थनार्थ उतरला अनुराग कश्यप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:01 AM IST

Animal game changer for Hindi
अनुराग कश्यप संदीप रेड्डी वंगा

Animal game changer for Hindi : अनुराग कश्यपने संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाभोवती टीका होत असताना त्याला पाठिंबा दर्शवला आहे. सोशल मीडियावर अनुरागने सांगितले की संदीप सध्या "सर्वात गैरसमज असलेला, जज केला जाणारा आणि टीका होणारा चित्रपट निर्माता आहे." अनुरागने अ‍ॅनिमल हा हिंदी सिनेमासाठी गेम चेंजर असल्याचेही म्हटलंय.

मुंबई - Animal game changer for Hindi : 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं असलं तरी याचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यावर काही जणांनी खरपूस टीकाही केली होती. मात्र फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्या कामाचं भरपूर कौतुकही केलं. एसएस राजामौली, राम गोपाल वर्मा, करण जोहर यांच्यासह इंडस्ट्रीतील वरिष्ठांकडून त्याला पाठिंबा मिळाला होता. आता त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्यांमध्ये अनुराग कश्यपही सामील झाला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांच्या एका विभागाकडून अ‍ॅनिमलला टीकेला सामोरे जावे लागत असल्याने, अनुराग कश्यपने सांगितले की, संदीपला निर्माता म्हणून टीकाकार समजून घेऊ शकलेले नाहीत.

सोशल मीडियावर अनुराग कश्यपने संदीपसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की संदीपला न्यायासाठी खूप संघर्ष करावा लागला असला तरी त्याला तो उत्तम माणूस समजतो. अनुरागने असेही नमूद केले की दोनदा 'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर त्याला संदीपला भेटायचे होते आणि त्याच्यासाठी काही प्रश्न होते, त्याची संदीपने संयमाने उत्तर दिले.

"संदीप रेड्डी वंगासोबत खूप छान संध्याकाळ घालवली. या क्षणी तो एक सर्वात गैरसमज झालेला, जज केला जाणारा आणि टीका झालेला चित्रपट निर्माता आहे. माझ्यासाठी, तो सर्वात प्रामाणिक, असुरक्षित आणि एक सुंदर माणूस आहे. खरंतर त्याच्या चित्रपटाबद्दल कोण काय म्हणतंय, याने मला काहीच फरक पडत नाही. हा चित्रपट मी दोनदा पाहिला आहे. मला त्याला माणसाला भेटायचे होते आणि मला काही प्रश्न होते, आणि मी त्याच्या चित्रपटाबद्दल जे काही विचारले त्या प्रत्येक गोष्टीची त्याने उत्तरे दिली. तू जसा आहेस त्याबद्दल आणि संयम बाळगल्याबद्दल तुझे आभार.", असे अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर म्हटलं आहे.

सकारात्मक असो वा नकारात्मक, सिनेमाचा प्रभाव असू शकतो हे देखील अनुरागने मान्य केले. त्याने अ‍ॅनिमल सिनेमाचा हिंदी सिनेमात गेम चेंजर म्हणूनही उल्लेख केला. "मी पहिल्यांदा अ‍ॅनिमल पाहिल्यापासून 40 दिवस आणि मी दुसऱ्यांदा पाहिल्यापासून 22 दिवस झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ काळातील सर्वात मोठा गेम चेंजर असलेला हा एक चित्रपट आहे ज्याचा प्रभाव (चांगला किंवा वाईट) नाकारता येणार नाही. आणि चित्रपट निर्माता तो हे सर्व आपल्यावर घेतो. त्याच्यासोबत छान संध्याकाळ घालवली ," असे अनुरागने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल चित्रपट रिलीज झाल्यापासून भारतात 550 रुपयांच्या कलेक्शनसह मोठं व्यावसायिक यश मिळवारा चित्रपट ठरला आहे.

'अ‍ॅनिमल'च्या पाठोपाठ संदीप रेड्डी वंगा आगामी 'स्पिरिट' या चित्रपटात प्रभाससाठी दिग्दर्शन करणार आहे. अल्लू अर्जुनसोबत त्याच्या एका चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये वंगाची आपली खास छाप असेल अशी अपेक्षा आहे परंतु नवीन जग, भावना आणि नाट्य यांचा या निमित्तानं परिचय होईल.

हेही वाचा -

  1. रणबीर कपूर स्टारर रामायण चित्रपटाला होणार सुरुवात, नियोजनबद्ध शूटिंग शेड्यूल तयार
  2. कतरिना आणि विजय सेतुपतीच्या मेरी ख्रिसमसचे नेटिझन्सनी केले स्वागत
  3. 'गुंटूर कारम' पाहणाऱ्या महेश बाबूसह कुटुंबावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.