ETV Bharat / entertainment

रणबीर कपूरची पत्नी म्हटल्यानंतर आलिया भट्टचे चाहते पापाराझीवर भडकले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 12:30 PM IST

Alia bhatt and ranbir kapoor :अभिनेत्री आलिया भट्टची बहिण शाहीन भट्टनं 28 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी रणबीर कपूर शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आई नीतू कपूर आणि पत्नी आलिया भट्टसह उपस्थित झाला. दरम्यान, या सेलिब्रेशनमधील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओवर आलियाचे चाहते नाराज झाले आहेत.

Alia bhatt and ranbir kapoor
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

मुंबई - Alia bhatt and ranbir kapoor : अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टनं 28 नोव्हेंबरला तिचा 35वा वाढदिवस साजरा केला. रणबीर कपूर शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आई नीतू कपूर आणि पत्नी आलिया भट्टसोबत पोहोचला होता. या स्टार कपलसोबत सोनी राजदान आणि शाहीन भट्टही उपस्थित होती. रणबीर आणि आलियाला एकत्र पाहिल्यानंतर पापाराझींनाही आनंद झाला. त्यानंतर या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ पॅप्सनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळं आलियाचे चाहते संतापले.

आलिया भट्टचे चाहते नाराज : आलियाला रणबीरची पत्नी म्हटल्यावर फॅन्सचा राग आला. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरच्या कॅप्शनमध्ये रणबीर कपूरची पत्नी आलिया लिहिलं गेलं आहे. त्यानंतर या व्हिडिओवर एका चाहत्यांनी लिहिल, 'आलिया भट्ट स्वतः एक सुपरस्टार आहे आणि तिनं रणबीर कपूरपेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'ती आलिया भट्ट आहे, कधी राहाची आई आहे, कधी रणबीर कपूरची पत्नी आहे.. भाऊ थोड थांब'. आणखी एकानं लिहिलं, 'दोघेही यशस्वी स्टार आहेत, मग रणबीरची पत्नी म्हणण्यात काय अर्थ आहे?' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

आलिया एक सुपरस्टार : आलिया भट्टला नुकताच तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आलियानं तिचा नॅशनल अवॉर्ड हा क्रिती सेनॉन सोबत शेअर केला. क्रितीनं हा अवार्ड 'मिमी' चित्रपटासाठी जिंकला आहे. आलिया आणि रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी'मध्ये दिसली होती. आता ती 'जिगरा' आणि 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे रणबीर कपूर शेवटी 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. आता तो 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसेल. त्याचा हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवणाऱ्या पथकाचे सेलेब्रिटींनी मानलं आभार
  2. बिग बॉसचं घर पुन्हा बनलं रणांगण, एकमेकांना खाली खेचण्यात स्पर्धक गर्क
  3. टायगर ३ ची जगभरात कमाई वाढत असताना अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, कारण काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.