ETV Bharat / entertainment

बिग बॉसचं घर पुन्हा बनलं रणांगण, एकमेकांना खाली खेचण्यात स्पर्धक गर्क

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 11:38 AM IST

Bigg Boss 17 day 45 highlights : स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी बिग बॉसच्या घरात कुरघोड्या करत स्पर्धक एकमेकांना खाली खेचत असताना बिग बॉसचं घर पुन्हा एकदा रणांगणात बदललं आहे. मंगळवारच्या भागात बिग बॉसनं नॉमिनेशन टास्कची घोषणा केली. त्यामुळे अंकिता लोखंडे आणि नील भट्ट यांच्यात भांडण झालं. दिवस संपत असताना अभिषेक कुमारचा मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्याशी वाद झाला.

Bigg Boss 17 day 45 highlights
बिग बॉस 17 मधील 45 वा दिवस

मुंबई - Bigg Boss 17 day 45 highlights : बिग बॉसच्या घरात सतत चालणारी नौटंकी, भांडणं, वाढणाऱ्या आणि तुटणाऱ्या मैत्रीचे बंध, प्रत्येक क्षणाला घडणारं अकल्पित नाट्य यामुळे प्रेक्षक अवाक होऊन जातात. स्पर्धकांच्या घरातील 45 वा दिवसही याला अपवाद नव्हता. दिवसाच्या अखेरीस नॉमिनेशनची नाव उघड होत असताना स्पर्धक वाद घालताना दिसले. दिवसाभर वाद घालणाऱ्या अंकिता लोखंडे आणि नील भट्ट यांनी सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. तर अभिषेक कुमारचा मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्याशी वाद झाला.

अनुराग डोभाल शो सोडण्यासाठी इच्छूक, दंडही भरण्यास तयार

मंगळवारच्या एपिसोडमध्ये अनुराग डोभालने पुन्हा एकदा रिअ‍ॅलिटी शोमधून स्वेच्छेने बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर बिग बॉसनं बागेच्या परिसरात सर्व स्पर्धकांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधला. बिग बॉसनं सांगितलं की, शोची कायदेशीर टीम त्याच्या वकिलांशी संपर्क साधेल आणि 2-3 दिवसांत प्रतिसाद देईल. त्यानंतर अनुराग डोभालने बिग बॉसला दार उघडण्याची विनंती केली. त्यानं पुन्हा एकदा शो स्वेच्छेने सोडू जात असल्याचं सांगितलं. शो मधूनच सोडत असल्यामुळे त्याने 2 कोटी दंड म्हणून भरण्याची तयारीही दाखवली.

या आठवड्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक

या आठवड्यात शोमधून बाहेर जाणाऱ्यांच्या यादीत खानजादी नॉमिनेट झाली आहे. तिनं इतरांना नॉमिनेट करण्यापासून वाचवलं आहे. अनुरागने रिंकूला नॉमिनेट केलं, तिनं नॉमिनेशनसाठी विक्कीचं नाव घेतलं. नीलनं नॉमिनेशनसाठी अंकिताची निवड केली, परिणामी जोरदार वाद झाला. अंकिताने मन्नारा आणि नंतर अरुणला नॉमिनेट केले. या साखळीमुळे अरुण अस्वस्थ आहे. नॉमिनेशन कार्याच्या शेवटी, नामांकित स्पर्धकांमध्ये अनुराग डोभाल, रिंकू धवन, विकी जैन, अंकिता लोखंडे, नील भट्ट, मन्नारा चोप्रा, अरुण मशेट्टी यांचा समावेश होता.

नील भट्ट संपूर्ण हंगामासाठी नॉमिनेट

बिग बॉस 17 मधील स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता नील भट्ट याला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. ही घोषणा नीलच्या अंकिता लोखंडेसोबत झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर करण्यात आली आहे. "दिमाग रूम" मधील चर्चेदरम्यान, बिग बॉस सदस्यांना विचारण्यात आलं की ते संपूर्ण सीझनसाठी कोणाला नामनिर्देशित करू इच्छितात. अरुण मॅशेटे, सनी आर्या, सना रईस खान आणि अनुराग डोभाल यांच्यासह "दिमाग रूम" चा एक घटक असलेला विकी जैन यांन नील भट्टची निवड करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. व्हिडिओचा शेवट नीलची पत्नी ऐश्वर्या शर्माने केला आहे आणि विक्कीला "सर्वात मोठा डरपोक" म्हटलं.

अभिषेक कुमार विरुद्ध मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी

पुन्हा एकदा स्पर्धक अभिषेक कुमार बिग बॉस 17 च्या घरात मोठ्या वादात अडकला आहे. वादाच्या दरम्यान मन्नारानं त्याला गाढव म्हटलं. याला उत्तर म्हणून अभिषेक तिला हे घर सोडून दुसरीकडं जाऊन रडायला सांगतो. दरम्यान, अभिषेक मुनावरशी वाद घालतो. शोमधील नॉमिनेशन टास्कनंतर या सर्व घटना घडल्या.

हेही वाचा -

1. 'अ‍ॅनिमल' विरुद्ध 'सॅम बहादूर': अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत रणबीर कपूरच्या चित्रपटानं मारली बाजी

2. टायगर ३ ची जगभरात कमाई वाढत असताना अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, कारण काय?

3. सलमान खानला पुन्हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी, मुंबई पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.