ETV Bharat / crime

Sangli Youth Suicide : स्वतःला श्रद्धांजली वाहत प्रेमभंग झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Jul 5, 2022, 6:47 AM IST

Updated : Jul 5, 2022, 7:08 AM IST

या घटनेबाबत आष्टा पोलिसांनकडून मिळालेली माहितीप्रमाणे, वाळवा येथील खेड रोडवर एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात सुशांत भरत तोडके ( वय - 26 ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sangli Crime
सांगली गुन्हा

सांगली - प्रेमभंग झाला म्हणून एका प्रेमवीराने आधी मोबाईलवर प्रेमभंगाचा व्हिडिओ असणारा रील स्टेटसला ठेवलं, मग पुन्हा स्वतः च्या फोटोला श्रद्धांजली वाहून थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा या ठिकाणी एका शेतातल्या गोठ्यामध्ये सुशांत तोडके याने ही आत्महत्या केली आहे. ( Sangli crime news )

या घटनेबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहितीप्रमाणे, वाळवा येथील खेड रोडवर एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात सुशांत भरत तोडके ( वय - 26 ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुशांत तोडके हा गावातल्या एका शेतामध्ये शेतमजुरीचे काम करतो. ( Sangli Police ) तो मूळचा पलूस तालुक्यातील नागठाणे येथील असून, कामानिमित्त वाळवा या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. ( Sangli crime news )

सोमवारी सकाळच्या सुमारास सुशांत याने आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप स्टेटसला एक प्रेमभंग असणारा व्हिडिओ रील ठेवला. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर सुशांत याने आपल्याच फोटोला श्रद्धांजली वाहणारा फोटो बनवला आणि तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला. थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही वेळानंतर सुशांत याच्या नातेवाईकांनी सुशांत याचा व्हॉट्सअॅपवरचा स्टेटस पाहिला आणि सगळ्यांची एकच धावपळ सुरू झाली. ( Sangli crime news ) कुटुंबाने मग तो राहत असलेल्या घराच्या मालकाला संपर्क करून, सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर सुशांत याचे घरमालक ईशान गावडे हे सुशांतच्या शोधासाठी, तो काम करत असलेल्या शेतामध्ये पोहोचले होते. यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या गोठ्यामध्ये गेले असता, त्यांना सुशांतचा मृतदेह लटकत असल्याचा आढळून आला. ( Sangli Police ) या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचून पंचनामा करण्यात आला, असून या घटनेची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती आष्टा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Last Updated :Jul 5, 2022, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.