ETV Bharat / crime

Satara Crime : साताऱ्यात चोरट्यांनी एका रात्रीत १७ घरे फोडून बारा तोळ्याचे दागिने केले लंपास

author img

By

Published : Jan 21, 2023, 9:34 PM IST

crime
crime

सातारा जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी नागठाणे परिसरातील १७ बंद घरांमध्ये चोरी करत १२ तोळे सोने आणि ७५ हजारांची रोकड लंपास केली आहे.

सातारा - ऐन थंडीत जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी नागठाणे परिसरातील १७ बंद घरांमध्ये चोरी करत १२ तोळे सोने आणि ७५ हजारांची रोकड लंपास केली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

चोरट्यांकडून बंद घरे टार्गेट - साताऱ्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवे, निनाम, कुसवडे, धनवडेवाडी, वेचले या गावांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घरे फोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. एका रात्रत तब्बल १७ बंद घरे फोडण्यात आली आहेत. थंडीच्या दिवसात बाहेर फारशी वर्दळ नसते, ही संधी साधून चोरट्यांनी बंद घरे टार्गेट केली.

दिसेल तो ऐवज पळवला - कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी मांडवे गावातील ६ बंद घरे फोडली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आणि सापडेल तो ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. निनाम येथील ३, कुसवडे, धनवडेवाडी या गावांतीलही बंद घरे फोडली. एकूण १७ घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्र गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाकडून शोध - चोरीच्या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. पंचनामा करण्यास सुरुवात केल्यानंतर कुसवडे व धनवडेवाडी येथील घरातून रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. अनेक तक्रारदार परगावी आहेत. त्यांना घटनेची माहिती देऊन बोलावून घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.