ETV Bharat / city

Silica Scientific Company Fire : अंबिका नगर येथील कंपनीत सिलेंडर स्फोट, रस्त्याचे कामामुळे अग्निशमन दल पोहचले उशिरा

author img

By

Published : May 29, 2022, 7:20 AM IST

Ambika Nagar Company Fire
Ambika Nagar Company Fire

ठाण्यातील अंबिका नगर येथे ( Thane Ambika Nagar Company Fire ) असलेल्या सिलिका सायंटिफिक या इंडस्ट्रियल कंपनीला शनिवारी रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास ९ सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

ठाणे - ठाण्यातील अंबिका नगर येथे ( Thane Ambika Nagar Company Fire ) असलेल्या सिलिका सायंटिफिक या इंडस्ट्रियल ( Silica Scientific ) कंपनीला शनिवारी रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास ९ सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याची कंपनी असल्याने या कंपनीत गॅस सिलेंडरचा वापर होत होता. दरम्यान हा भाग रहिवाशी असून येथील महत्त्वाचा रस्त्याचे काम गेली महिनाभर सुरू असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहचल्या आरोप स्थानिकांनी केला. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठेकेदारावर कारवाईची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

अंबिका नगर परिसरातील घटना - ठाण्याच्या अंबिका नगर परिसरात सिलिका सायंटिफिक कंपनी आहे. ही कंपनी प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याची आहे. या कंपनीत शनिवारी रात्री 10च्या सुमारास आग लागली आणि एकच खळबळ उडाली. या कंपनीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर असल्यामुळे स्फोट होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दिल्यानंतर घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी, २- फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकरसह तात्काळ दाखल झाले होते. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

स्थानिकांचा आरोप - घटनास्थळी आग विजवताना अग्निशमन दलाची गाडी उशिरा पोहचल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले. ज्या कंपनीला आग लागली. त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्या पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याने अग्निशमनची गाडी पोहचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. एकामागून एक अश्या 9 सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि स्थनिक नागरिक सैरावैरा पळाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे यावेळी आपत्ती विभागाने सांगितले.

हेही वाचा - Fourth Standard Boy Rape : धक्कादायक! चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.