ETV Bharat / city

9 हजार घरांची लॉटरी संपन्न: कलेक्टर लँड मिळवून दिल्यास गरिबांना घरे देऊ- जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Oct 14, 2021, 10:19 PM IST

9 हजार घरांची लॉटरी संपन्न
9 हजार घरांची लॉटरी संपन्न

म्हाडाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्र्यांचे अभिनंदन केले. 1 डिसेंबर 2019 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्ण होणार आहे. त्यानंतर ठाणे ते नागपूर मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठाणे - जनसामान्यांमध्ये असलेली म्हाडाची विश्वासाहर्ता अबाधित असल्याने केवळ 9 हजार घरांसाठी तब्बल तब्बल अडीच लाख अर्ज आल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कलेक्टर लँड हस्तांतरीत केली तर गोरगरिबांसाठी आणखी स्वस्त घरे बांधू, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी म्हाडाच्या ठाण्यातील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. यावेळी दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिले.

नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त लोकांना आपल्या हक्काची घरे लवकरच मिळतील असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. क्लस्टर योजनेंतर्गत बांधल्या जाणार्‍या हजारो इमारतींमध्ये, गोरगरीब नागरिकांना खेळाची मैदाने, वीज पाणी अशा सुविधांनी सुसज्ज लाखो घरे लवकरच मिळतील, असा शब्द पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

9 हजार घरांची लॉटरी संपन्न

हेही वाचा-चित्रा वाघ यांनी ब्लॅकमेलिंग करणे थांबवावे - आमदार विद्या चव्हाण

म्हाडाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्र्यांचे अभिनंदन केले. 1 डिसेंबर 2019 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्ण होणार आहे. त्यानंतर ठाणे ते नागपूर मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा-धक्कादायक : इंस्ट्राग्रामवर मैत्री करून कुटुंबाला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

जितेंद्र आव्हाड म्हणाले, की अनंत समस्यांना सामोरे जात लाखो नागरिक आज छोट्या छोट्या घरांमध्ये वास्तव्य करून राहतात. त्यांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी आपण म्हाडाच्या मार्फत परवडणारी घरे बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे मनोगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. आज जवळपास नऊ हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी देताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे. कलेक्टर लँड लवकरात लवकर हस्तांतरित करावी. जेणेकरून त्यावर गोरगरिबांसाठी परवडणारी घरे बांधता येतील, अशी विनंती आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेवर बोलताना प्रत्येकाचा एक अर्जुनाचा डोळा असतो असा सांकेतिक इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

हेही वाचा-राज्य सरकारकडून आमदारांच्या विकास निधीत 1 कोटींनी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.