ETV Bharat / city

St Employee Strike Solapur: आंदोलकांनी सेवा समाप्त झालेल्या 34 कर्मचाऱ्यांचा हार घालून केला सत्कार

author img

By

Published : Jan 4, 2022, 5:00 PM IST

संपात सहभागी असलेल्या आंदोलकांनी सेवा समाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा हार घालून सत्कार ( Protesters felicitated 34 st employees ) केला आहे. सेवा समाप्ती नंतर आता आणखीन काय करणार, फासावर लटकवून टाका, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

st employees felicitated solapur
एसटी कर्मचारी सत्कार सोलापूर

सोलापूर - सोलापूर आगारातील जवळपास 600 एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एक तर शासनात, नाही तर मसनात, अशी त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे, काही तुरळक एसटी बसेसच धावत आहेत. 4 जानेवारीला एकाच दिवशी 8 एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा आदेश निघाला आहे. आजतागायत सोलापूर आगारातील एकूण 35 एसटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

माहिती देताना सेवा समाप्त एसटी कर्मचारी

हेही वाचा - National Anthem Solapur : एकाचदिवशी एक हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रगीताचे सामुहिक गायन

संपात सहभागी असलेल्या आंदोलकांनी सेवा समाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा हार घालून सत्कार ( Protesters felicitated 34 st employees ) केला आहे. सेवा समाप्ती नंतर आता आणखीन काय करणार, फासावर लटकवून टाका, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

सोलापूर आगारातील जवळपास 600 कर्मचारी अद्यापही संपात -

29 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. परिवहन मंत्री परब यांनी पगार वाढीची घोषणा केली असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांनी ती मान्य केली नाही. आमची मागणी पगारवाढ नसून शासनात विलिनीकरण ही प्रमुख मागणी असल्याची माहिती संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दिली आहे. सुरुवातीला सोलापूर आगारातील 700 एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. पण, निलंबन किंवा सेवा समाप्तीच्या कारवाया होत असल्याने काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र, अद्यापही बहुतांश एसटी बसेस आगारात धूळखात आहेत.

संप सुरू झाल्यापासून आजतागायत 35 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता -

संपात सहभागी झालेल्या आजतागायत एकूण 35 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 एसटी कर्मचाऱ्यांचे डिसमिस ऑर्डर निघाले आहे. त्यामध्ये बी.एस. पारके ( लिपिक ), एस.बी. खुर्द ( वाहक ), आर.एम. टोपे ( वाहक ), आर.एम. राऊतराव ( वाहक ), ए.एस. लोंढे ( वाहक ), एस.डी. पाडवी ( वाहक ), ओ.ए. पाटील ( वाहक ), व्ही.एस. कुंभार ( चालक ) यांना डिसमिस म्हणजेच, त्यांची सेवा समाप्त केली आहे. आंदोलनात सहभागी झालात, आणि कामावर रुजू झाला नाही, असा ठपका ठेवून डिसमिस ऑर्डर काढण्यात आली आहे.

हेही वाचा - Solapur District Year Ender 2021 - कोरोना महामारीसह 'या' घटनांमुळे सोलापूर जिल्हा वर्षभर चर्चेत राहिला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.