ETV Bharat / city

National Anthem Solapur : एकाचदिवशी एक हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रगीताचे सामुहिक गायन

author img

By

Published : Jan 1, 2022, 7:30 PM IST

Solapur
सोलापूर

आज नववर्षाच्या पहिला दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात राष्ट्रगीत ( Jana Gana Mana Singing In Solapur ) गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायले.

सोलापूर - शाळांमध्ये दररोजच राष्ट्रगीत गायले जाते. ग्रामपंचायत कार्यालयात फक्त राष्ट्रीय सणादिवशी म्हणजे वर्षातून फक्त तीन वेळाच राष्ट्रगीत ( Jana Gana Mana Singing In Solapur ) गायन होते. आज नववर्षाच्या पहिला दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायले.

एकाचदिवशी एक हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रगीताचे सामुहिक गायन

देशभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न -

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात हा पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावभर व जिल्हाभर देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सीईओ स्वामी यांनी केल्याने त्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख त्यांना नेमून दिलेल्या तालुक्‍यांमध्ये हजर होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा -


याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अक्षरांची मानवी रांगोळी साकारण्यात आली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, झाशीची राणी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. स्फुर्तिगीते, देशभक्ती गीतांनी जिल्ह्यातील सर्व गावात देशभक्तीपर वातावरण तयार झाले होते. ढोल ताशा अन् लेझीम खेळत खेळांचा साथ संगत करत विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला होता. विविध रंगीबेरंगी फुगे,मैदानावर भारताचा नकाशा रेखाटणेत आला होता. कोरोना नियंमांचे पालन करत आझादीला 75 वर्षे पुर्ण झाले बद्दल महोत्सव साजरा करण्यात आला. रंगेबेरंबी झेडपी फुलांनी संसद ग्राम, शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळेचा परिसर सजविण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - Nitin Gadkari Shopping :...आणि नितीन गडकरी नातवांच्या खाऊसाठी पोहोचले दुकानात; व्हिडीओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.