ETV Bharat / city

दिवंगत डॉ. चंद्रकांत भानुमतेंचे शेतीसह असंघटित क्षेत्रात भरीव संशोधन - प्रा. डॉ. गौतम कांबळे

author img

By

Published : Jan 5, 2022, 10:18 PM IST

Updated : Jan 5, 2022, 10:34 PM IST

dr gautam kamble say late dr chandrakant bhanumathes extensive research in the unorganized field including agriculture
दिवंगत चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यानात बोलताना डॉ.गौतम कांबळे

वसुंधरा कला महाविद्यालय आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या वतीने दिवंगत डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अर्थशास्त्र परिषदेच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.

सोलापूर - "डॉ. चंद्रकांत भानुमते यांनी शेती, वंचित, उपेक्षित इ. बद्दल आत्मीयता असल्यामुळे त्यांचे संशोधन भरीव आहे. वंचित, उपेक्षित, कामगारांच्या संघटना नसलेल्या कामगारांचा अभ्यास त्यांनी केला. गूळ मार्केटिंग सर्वे केला. महिला कामगार यांच्या समस्या मांडून त्यांच्यावर उपाय सुचविला. विशेषतः सोलापुरातील बिडी कामगार महिलांच्या बाबतीत संशोधनात त्यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या मांडून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मालक वर्गाने केला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली",असे मत डॉ. गौतम कांबळे (संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, पु.अ.हो सोलापूर विद्यापीठ) यांनी वसुंधरा महाविद्यालयात चंद्रकांत भानुमते यांच्या स्मृती व्याख्याना व्यक्त केले.

हेही वाचा - संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप

ते सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद व वसुंधरा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की, " लहान उद्योगासंबंधी धोरण राबण्यामध्ये महत्त्वपूर्ण काम आम्ही दोघांनी मिळून केले. भांडवली व्यवस्था छोटे उद्योग नष्ठ करून टाकेल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. याशिवाय ग्रामीण गृहनिर्माण, महिला स्थानिक समस्या, यावर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. कामगारांचा विमा उतरविला पाहिजे, पीक स्पर्धाचे आयोजन करावे तसेच कोल्हापूरच्या गुळाला पेटंट घेतला पाहिजे. या महत्त्वपूर्ण सूचना त्यांच्या संशोधनात त्यांनी मांडल्या होत्या.

हेही वाचा - Fulbright Scholarship to Disale Guruji : सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची 'फुलब्राईट' स्कॉलरशिप

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड म्हणाल्या, की विचार हे कायमस्वरूपी माणसाला जिवंत ठेवतात. अलीकडे माणसातला माणूस हरवून गेला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःला विकसित करण्यासाठी चांगल्या व्यक्तींच्या स्मृती जपल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडली.

हेही वाचा - National Anthem Solapur : एकाचदिवशी एक हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रगीताचे सामुहिक गायन

यावेळी अर्थशास्त्र परिषदेच्या १६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बी. एच. दामजी यांनी अर्थशास्त्र परिषदेची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी तर परिचय प्रा. डॉ. तानाजी देशमुख, आभार प्रा. एस. बी. शिंदे आणि सूत्रसंचालन डॉ. संगीता भोसले यांनी केले.

Last Updated :Jan 5, 2022, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.