ETV Bharat / city

आजपासून एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू... प्रवासीही योग्य खबरदारी घेऊन करतायत प्रवास

author img

By

Published : Sep 18, 2020, 6:24 PM IST

Updated : Sep 18, 2020, 6:47 PM IST

अंतरनियमांचे पालन करून एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह आंतरजिल्हा वाहतुकीस एसटीला २० ऑगस्टपासून परवानगी मिळाली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर ४४ ऐवजी २२ प्रवाशीच एसटीतून प्रवास करत होते. त्यामुळे एसटीसाठी इंधन खर्च व मनुष्यबळही अधिक लागत होते. एसटीचा खर्चही वाढला. यानंतर १०० टक्के आसनक्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे केली होती. ही परवानगी आता मिळाली आहे.

राज्यात एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू
राज्यात एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू

पुणे - महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आजपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत आहे. निम्म्या प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिली. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात तरी टळणार असून, प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.

आजपासून एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू
प्रवासी योग्य खबरदारी घेऊन करतायत प्रवास

अंतरनियमांचे पालन करून एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह आंतरजिल्हा वाहतुकीस एसटीला २० ऑगस्टपासून परवानगी मिळाली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासी वाहतूक करताना ४४ ऐवजी २२ प्रवाशीच एसटीतून प्रवास करत होते. त्यामुळे एकाच मार्गावर धावणाऱ्या एसटीसाठी इंधन खर्च व मनुष्यबळही अधिक लागत होते. एसटीचा खर्चही वाढला. त्यामुळे १०० टक्के आसनक्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे केली होती. त्यावर राज्य सरकारने एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अखेर परवानगी दिली. त्यामुळे आजपासून राज्यभर पूर्ण आसन क्षमतेने एसटी धावत आहे. एसटी प्रवासात प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच, बसचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ती मार्गस्थ करण्यात येत आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आक्रमक; खेड पंचायत समिती इमारतीवरुन शिवसेनेचे पारंपरिक जागरण गोंधळ आंदोलन

'आपण सहा महिन्यांनंतर गावाला जात आहे. खूप चांगलं वाटत आहे. योग्य खबरदारी घेऊन प्रवास करत आहोत. राज्य सरकारने एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. सर्वांनी बसताना सॅनिटायझर व मास्कचा वापर केला तर घाबरण्याचे काही कारण नाही. लोकांमध्ये जनजागृती झाली असून आता स्वतः स्वतःची खबरदारी घेत आहोत,' अशी माहिती प्रवाशांनी यावेळी दिली.

Last Updated :Sep 18, 2020, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.