ETV Bharat / city

'राज ठाकरे हे तर पुष्पातले फुसके फ्लॉवर'; शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर

author img

By

Published : Apr 3, 2022, 4:02 PM IST

सार्वजनिक ठिकाणांवरचे सर्व भोंगे काढावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतानाच दिला होता. परंतु फडणीसांनी तो राबवला नाही, तुम्ही जाणीवपूर्वक या निकालाकडे दुर्लक्ष केलं अशी टीका मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली.

रुपाली पाटील
रुपाली पाटील

पुणे - राज ठाकरे हे खरे महाराष्ट्राचे फायरब्रँड आहेत. परंतु काल झालेल्या पाडव्याच्या सभेमध्ये भाजपाने केलेल्या ED च्या कारवाईनंतर हेच राज ठाकरे फुसके फ्लॉवर झाले आहेत, अशी टीका मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर

...मग जातीयवाद कसा - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्य जाती पातीच्या राजकारणात विखुरले गेल. दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी शरद पवारांनी भाजली. असे सांगत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर राज ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये सडकून टीका केली होती. आता त्यावर उत्तर देताना रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीमध्ये कधीच जातीच राजकारण केलं गेलं नाही. उलट आमच्या पक्षात सगळ्याच जातीचे लोक कार्यकर्त्यांपासून मंत्री पदापर्यंत आहेत. मग अशा पक्षांमध्ये जातीवाद कसा असेल असा सवाल करत राज ठाकरे यांनी जो जतीवादाचा आरोप केला आहे. त्यात काही तथ्य नसल्याचं रुपाली ठोंबरे यांनी सांगितले आहे.

भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर - सध्या महाराष्ट्रात आणि देशात जी परिस्थिती आहे. बेरोजगारी पासून अनेक मुद्दे असताना देखील त्याच्यावरती चकार शब्ददेखील न काढता फक्त महाविकास आघाडीवर राज ठाकरे यांनी टीका केली. यावरूनच लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टी नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांचा राजकारणासाठी उपयोग करून घेत आहे.

तेव्हा भोंग्यावर का बोलले नाही - कालच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी जर मस्जिदींवरील भोंगे काढले नाहीत तर आम्ही मस्जिदींसमोर साऊंड लावून हनुमान चालीसा वाजवू अशी धमकी देखील दिली होती. त्यावर बोलताना रूपाली पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणांवरचे सर्व भोंगे काढावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतानाच दिला होता. परंतु फडणीसांनी तो राबवला नाही, तुम्ही जाणीवपूर्वक या निकालाकडे दुर्लक्ष केलं अशी टीका करत भाजपाकडे आता विकासावर बोलण्याचा एकही मुद्दा राहिला नाही. त्यामुळेच मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय काढला जातोय अस सांगत भाजपला देखील त्यांनी टार्गेट केल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.