ETV Bharat / city

Anand Dave On Yakub Memon Grave controversy याकूब मेमनच्या कबरीवर 'देशद्रोही' असा बोर्ड लावा, कबरीवर चादर फूले टाकू नयेत -आनंद दवे

author img

By

Published : Sep 8, 2022, 5:20 PM IST

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai blasts) आरोपी याकूब मेमनला (yakub memon) फाशी दिल्यानंतर, मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमनच्या या कबरीला (yakub memon grave) मार्बल आणि संगमवरी दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईटने विद्युत रोषणाई (Electric lighting with LED lights) केली असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर राजकीय, धार्मिक वातावरण चांगलचं तापलं. यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave Hindu Mahasabha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बडा कब्रस्तान प्रशासनाने मेमन याच्या कबरीवर देशद्रोही ( Traitor Board) असा बोर्ड लावावा. तिथं फुल-चादर काहीच टाकू नये. अशी मागणी दवे यांनी केली.

Anand Dave On Yakub Memon Grave
याकूब मेमनच्या कबरीवर 'देशद्रोही' असा बोर्ड लावा आनंद दवे

पुणे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai blasts) आरोपी याकूब मेमनला (yakub memon) फाशी दिल्यानंतर, मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमनच्या या कबरीला (yakub memon grave) मार्बल आणि संगमवरी दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईटने विद्युत रोषणाई (Electric lighting with LED lights) केली असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर राजकीय, धार्मिक वातावरण चांगलचं तापलं. यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave Hindu Mahasabha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बडा कब्रस्तान प्रशासनाने मेमन याच्या कबरीवर देशद्रोही ( Traitor Board) असा बोर्ड लावावा. तिथं फुल-चादर काहीच टाकू नये. अशी मागणी दवे यांनी केली.

याकूब मेमनच्या कबरीवर 'देशद्रोही' असा बोर्ड लावा, कबरीवर चादर फूले टाकू नयेत -आनंद दवे

कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा त्यानंतर आज मुंबई पोलिसांचे (mumbai police) पथक बडा कब्रस्तान येथे दाखल झाले. बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली आहे. यावर हिंदू महासभाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave Hindu Mahasabha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मुंबईतील मुस्लीम दफनभूमीत कबर विकल्या जात आहेत. हयात असलेल्या अनेकांनी तेथे कबरीसाठी जमिनीचा तुकडाही बुक केला आहे.

मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. मात्र, आता ही कबर संगमवर दगडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली आहे. त्यामुळे एका बॉम्बस्फोटातील आरोपीची कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने दवे यांच्याशी चर्चा केली आहे.

भाजपचा शिवसेनेवर आरोप दुसरीकडे कालपासून या सजवलेल्या कबरीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याकुब मेमनच्या कबरीचं मजारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबरीचे मझारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. हेच त्याचं मुंबईवरच प्रेम का? हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी, असा हल्लाबोल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

एका बॉम्बस्फोटातील आरोपीची कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी हिंदू महासभेचे आनंद दवे यांच्याशी चर्चा केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.