ETV Bharat / city

Yakub Memon Grave : याकूब मेमनच्या कबर रोषणाईवरुन भाजपाची उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका; वाचा, कोण काय म्हणालं..

author img

By

Published : Sep 8, 2022, 12:50 PM IST

याकूब मेमनच्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईटने lighting Yakub Memon grave विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती समोर आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी याची दखल घेत तातडीने विद्यत रोषणाई हटवली आहे. आता याचवरुन राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपाने महाविकास आघाडी BJP criticized Uddhav Thackeray सरकारच्या काळात ही हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Yakub Memon Grave
Yakub Memon Grave

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमन ज्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमनच्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईटने lighting Yakub Memon grave विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती समोर आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी याची दखल घेत तातडीने विद्यत रोषणाई हटवली आहे. आता याचवरुन राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपाने महाविकास आघाडी BJP criticized Uddhav Thackeray सरकारच्या काळात ही हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका करण्यात आली आहे.

भाजपा आमदार राम कदमांची टीका : दुसरीकडे कालपासून या सजवलेल्या कबरीच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याकूब मेमनच्या कबरीचे मजारमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबरीचे मझारमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. हेच त्याचं मुंबईवरच प्रेम का? हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी, असा हल्लाबोल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका : आम्ही याचा निषेध करत आहोत. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मी मागणी करत आहे. भाजपा सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभिकरण केले त्यांना शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केले याचे उत्तर द्यायला हवे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

'ते दाऊदचे प्रचारक' : सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहिले होते, असा निशाणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेल्यावर दाऊदचे सर्मथक होते. मात्र आता ते दाऊदचे प्रचारक आहेत. कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली. सुशोभिकरणासाठी संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करत आहे, असा आरोप शेलारांनी केला आहे.

कोण होता याकूब मेमन? : याकूब मेमन हा मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला फासावर चढविण्यात आले होते. फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.