ETV Bharat / city

NCP Agitation Against Girish Bapat : 'अहो बापट बंद करा नाटक,' राष्ट्रवादीचे खासदारांच्या कार्यालयासमोर निदर्शने

author img

By

Published : Mar 31, 2022, 5:08 PM IST

NCP Agitation Against Girish Bapat
NCP Agitation Against Girish Bapat

खासदार गिरीश बापट मागील काही दिवसांपासून पुण्यातील पाणी प्रश्नावर आक्रमक झाले आहे. त्याविरुद्ध आता राष्ट्रवादी गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली ( NCP Agitation Against Girish Bapat ) आहे.

पुणे - गेल्या काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट हे पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहे. खासदर बापट यांनी थेट आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचे प्रेशर चेक ( Girish Bapat Check Commissioner Home Water ) केले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आता गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. 'अहो बापट बंद करा नाटक', असे म्हणत गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली ( NCP Agitation Against Girish Bapat ) आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, गेली 5 वर्ष पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. सत्ता असताना भाजपने पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातील समान पाणी पुरवठा योजना आणली. पण, त्याचे काय झाले. 5 वर्ष झाल्यानंतर आत्ता खासदार गिरीश बापट यांना जाग आली आहे. एवढी वर्ष भाजपने आणि खासदार गिरीश बापट यांनी काय केला, असा जगताप यांनी खासदार बापट यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर आंदोलन

आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर ठीक पण... - काही दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी थेट आयुक्त विक्रम कुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी आयुक्तांच्या घरातील पाण्याचे प्रेशर ठीक आहे, पण त्यांना इतर प्रेशर खूप असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी राज्य सरकारच्या प्रेशर खाली आयुक्त काम करत असल्याची टीका केली. पुणे शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांत कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुधरला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशाराही खासदार गिरीश बापट यांनी दिला होता.

हेही वाचा - ED raids on Advocate Satish Ukes home : आता न्यायालयानेच सुमोटो काढून लोकशाही वाचवावी- नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.