ETV Bharat / city

Pune Crime News : पुण्यात मुलाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू, मुलीच्या आईसह चौघांना वारजे पोलीसांनी केली अटक

author img

By

Published : Mar 18, 2022, 5:12 PM IST

पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली ( woman was beaten to death by woman in Pune ) होती. बुधवारी दुपारी ही शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमध्ये ही घटना घडली होती. गुरुवारी सकाळी त्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांत त्या मुलाच्या भावाने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणातील चार आरोपीला अटक केली होती.

Pune Crime News
पुण्यात मुलाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू

पुणे - पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली ( woman was beaten to death by woman in Pune ) होती. बुधवारी दुपारी ही शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमध्ये ही घटना घडली होती. गुरुवारी सकाळी त्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांत त्या मुलाच्या भावाने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणातील चार आरोपीला अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता आरोपीला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांची प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण?

शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमधील वंदना विजय पायगुडे या राहतात. त्यांनी मुलीला त्रास देतो म्हणून कोथरूड येथील प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय 22 वर्ष) या युवकाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

युवकाला केली होती गंभीर मारहाण -

बुधवारी दुपारी घरी मुलीला भेटायला आलेल्या प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला. यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले होते. त्यानंतर तो तरुण तेथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला दोन युवकांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली होती. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. युवकाला मारहाण करून रिक्षामधून दोन जण पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी -

आता या प्रकरणी वारजे पोलीसांनी एकूण चौघांना अटक केली असून त्यात मारहाण करणारी मुलीची आई, मुलीचे वडील, मुलीचा भाऊ आणि त्याचा मित्र यांचा समावेश आहे. आता या आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली आहे.

हेही वाचा - Sambhaji Bhides Controversial Statement : इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू - संभाजी भिडेंनी ओकली गरळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.