ETV Bharat / city

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 7 वर्षे पूर्ण...मात्र अद्याप तपास यंत्रणेला अपयशच

author img

By

Published : Aug 20, 2020, 12:12 PM IST

Updated : Aug 20, 2020, 2:27 PM IST

narendra dabholkar murder
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला 7 वर्ष पूर्ण...मात्र अद्याप तपास यंत्रणेला अपयशच

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी शहरातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. आज या घटनेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासात अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. मात्र आजही सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठित यंत्रणेकडून हत्येचा पूर्ण तपास झालेला नाही. त्यामुळे आज ओंकारेश्वरच्या पुलावर अंनिसतर्फे सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी शहरातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. आज या घटनेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासात अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. मात्र आजही सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठित यंत्रणेकडून हत्येचा पूर्ण तपास झालेला नाही. त्यामुळे आज ओंकारेश्वरच्या पुलावर अंनिसतर्फे सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला 7 वर्षे पूर्ण...मात्र अद्याप तपास यंत्रणेला अपयशच

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर दर महिन्याच्या 20 तारखेला आम्ही या पुलावर एकत्र येऊन डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करतो. दर महिन्याला अस वाटतंय की आम्ही दाभोलकर सरांना सांगतोय, की सर नका जाऊ मॉर्निग वॉकला तिथं तुम्हला गोळ्या मारतील. आज सात वर्ष पूर्ण झाली तरी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे मुख्य सूत्रधार अजूनही पकडले गेले नाही याची खंत अजूनही आमच्या मनात आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

हत्या नाही..दहशतवादी कृत्य

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद केळकर आणि सचिन अंदुरे आणि मे 2019 मध्ये अॅड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अमोल काळे या संशयित आरोपी विरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित दिवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरोधात देखील अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉ.वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या हत्येमागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे प्राचार्य कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उलगडले आहेत. या गुन्ह्यांमधील संशयित आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्रे या चार गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या आहेत. बंगळूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या सशस्त्र विषयक अहवालानुसार कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेले एक पिस्तुल आणि प्राचार्य कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी देखील वापरले आहे. या चारही गुन्ह्यांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झाली.

कर्नाटक एसआयटीने झारखंड राज्यातून ऋषिकेश देवडीकर याला गौरी लंकेश हत्येतील संशयित म्हणून अटक केले. तो तेथे पेट्रोल पंपावर कामावर होता. यावरून खून करणाऱ्या गटाच्या यंत्रणेने किती लांब हात पसरले आहे, हे देखील लक्षात येते. सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्र असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपीचा पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाची असलेला संबंध रेकॉर्ड वर आलेला आहे. यातून हेच स्पष्ट झाले आहे की, या फक्त हत्येच्या घटना नसून हा सर्व प्रकार म्हणजे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींना युएपीए अॅक्ट 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात न्यायालयाने देखरेख करावी यासाठी दाभोलकर कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी देखील अशीच याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही हत्येतील साधर्म्य लक्षात घेऊन दोन्ही याचिका एकत्र केल्या आहेत. कोरोनामुळे टाळेबंदी घोषित होईपर्यंत प्रत्येक महिन्याला सीबीआय व महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक या दोन्ही तपास यंत्रणा त्यांच्या कामाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यत न्यायालयासमोर ठेवत आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयाने तपासावर नियमित देखरेख करून सरकार व तपास यंत्रणांना वेळी धारेवर धरले आहे.

Last Updated :Aug 20, 2020, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.