ETV Bharat / city

Zomato Delivery Boy Kiss Case : अशा गोष्टी समाजात कुठेही घडू नयेत, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Sep 20, 2022, 1:03 PM IST

Updated : Sep 20, 2022, 1:56 PM IST

Supriya Sule Statment on Zomato Delivery Case
झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणी सुप्रिया सुळे

पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नामांकित सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी ( Zomato Delivery Boy ) करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले आहे. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे ( Kondhwa police case against zomato delivery boy ) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत डिलिव्हरी बॉयला ( Zomato boy arrest in Pune ) अटक केली आहे.

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नामांकित सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा ( Zomato Delivery Boy Molested Young Girl ) धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले आहे. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत डिलिव्हरी बॉयला अटक ( Kondhwa Police Case Against Zomato Delivery Boy ) केली आहे.

झोमॅटो डिलिव्हरी बाॅयप्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या

त्याला शिक्षा झालीच पाहिजे : सुप्रिया सुळे : रईस शेख (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जे झाले आहे ते खूपच दुर्दैवी आहे, असे व्हायला नको पहिजे होते. अशा गोष्टी समाजात कुठेही होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, डिलिव्हरी कंपनीनेदेखील याबाबत काळजी घेतली पाहिजे. ज्याने हे केले आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत यावेळी सुळे व्यक्त केले.


पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाणा करून फिर्यादीचा धरला हात : फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटो अॅप करून जेवण मागवले होते. जेवणाचे पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाणा करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि त्यांच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले.

गालाचे दोन वेळा घेतले चुंबन : जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि तिच्या गालाचे दोन वेळा ( Young Girl Molestation Case ) चुंबन घेतले.

Last Updated :Sep 20, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.