ETV Bharat / city

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; सराफा व्यावसायिकाला लुटले, पोलिसांचा धाक फक्त नावाला?

author img

By

Published : Apr 5, 2022, 4:24 PM IST

Updated : Apr 5, 2022, 5:24 PM IST

koyta gang
पुणे कोयता गँग

पुण्यातील लोहगाव परिसरात सराफ व्यावसायिकाला गळ्याला कोयता लावून (Koyta Gang) लुटल्याची घटना सोमवारी घडली होती. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. व्यावसायिकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये (Vimantal police station) तक्रार दिली आहे.

पुणे - पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना (Pune Robbery) वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात सराफ व्यावसायिकाला गळ्याला कोयता लावून (Koyta Gang) लुटल्याची घटना सोमवारी घडली होती. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. व्यावसायिकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये (Vimantal police station) तक्रार दिली आहे.

संजय महाले - व्यावसायिक

चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही - हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात सक्रिय झालेत. लोहगाव येथील आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफ दुकानामध्ये दोन चोरटे शिरले. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. एकाने सराफ व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवला, तर दुसऱ्या चोरट्याने पकडून ठेवले. जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजाराचे दोन सोनसाखळ्या लांबल्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पुणे शहरामध्ये कोयता गँग सक्रिय - संध्याकाळी साडेपाच वाजता दोन चोर दुकानात आले. त्यांनी मला गळ्यातील चैन दाखवण्याचा बहाणा केला. बऱ्याच वेळ त्यांनी चैन गळ्यात घालून पाहिल्या, त्यानंतर मी त्या चैन काढून घेतल्या आणि पाठमोरा होऊन चैन डिस्प्लेला लावत असताना त्यातील एकाने मागून माझा गळा दाबला, तर एकाने कोयत्याचा धाक दाखवून काउंटरवरून उडी मारली. माझा साधारण अडीच तोळ्यांचा माल घेऊन त्यांनी पोबारा केला. त्यांच्या हातात कोयता असल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले, असे सराफा व्यावसायिक संजय महाले यांनी सांगितले आहे.

Last Updated :Apr 5, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.