ETV Bharat / city

Rakhi Festival : पुणे शहरात आकर्षक राख्या विक्रीस दाखल; यंदा राख्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ

author img

By

Published : Aug 8, 2022, 1:46 PM IST

Colorful Rakhi Shops
आकर्षक राख्या विक्रीस दाखल

पुणे शहरातील विविध भागात रंगीबेरंगी राख्यांची दुकाने ( Pune City Markets ) सजली आहे. तर बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत असून राख्या खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे. पण यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ ( About 20 percent hike in Rakhi rates ) झाली आहे.

पुणे - बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन गुरुवारी (ता. ११) साजरा होणार आहे.गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. रक्षाबंधनही निर्बंधात साजरे ( Rakshabandhan festival ) करावी लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाले असल्याने आणि रक्षाबंधन अकरा दिवसांवर येऊन ठेपलेल असल्याने पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत असून राख्या खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे.पण यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी ( About 20 percent hike in Rakhi rates ) वाढ झालेली आहे.

रक्षाबंधन निमित्ताने बाजारपेठ सजली;पण यंदा महागाईमुळे राख्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ

भाऊना राखी पोहचण्यासाठी महिलांची लगबग - पुणे शहरातील रविवार पेठ ( Raviwar Peth Pune) , भोवरी आळी येथे रक्षाबंधन निमित्ताने बाजारपेठ सजले असून राज्यभरातून दुकानदार हे राख्या खरेदीसाठी तसेच महिला वर्ग ही राखी खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहे. परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊना वेळेत राखी पोहचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे.




व्यवसायिकांसाठी खुशी तर ग्राहकांसाठी खिश्याला कात्री - यंदाच्या रक्षाबंधनला व्यवसायिकांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष राखी विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने ग्राहकांमध्येदेखील उत्साह आहे. आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे 70 ते 80 टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची माहिती यावेळी व्यवसायिकांकडून देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी जरी रक्षाबंधनला ग्राहक वाढले असले तरी महागाईचा फटका यंदाच्या रक्षाबंधनला बसला असून यंदा रख्यांच्या किंमती मध्ये 20 टक्के एवढी वाढ झाली आहे.



यंदा बाजारात विविध राख्या दाखल - यंदा बाजारात चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या ( Lighting Rakhi) , छोटा भीम,( Chhota Bheem Rakhi) डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे. तसेच विविध प्रकारचे राख्या हे बाजारात दाखल झाले आहे. तसेच सध्या पारंपरिक राख्या ( Traditional Rakhi ) खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत नाही.

हेही वाचा :Shravani Somvar: श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार; हे आहे आजच्या दिवसाचे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.