Misuse Of Ajit Pawar Mobile Number : अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बिल्डरला खंडणीसाठी धमकी;6 जणांना ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Jan 14, 2022, 12:51 PM IST

Updated : Jan 14, 2022, 2:53 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगून या अज्ञातांनी 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. (Misuse Of Ajit Pawar Mobile Number ) या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला (Ajit Pawar ) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Mobile Number) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगून या अज्ञातांनी 20 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याची माहिती समोर आली आहे. (Misuse Of Ajit Pawar Mobile Number ) या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या व्यक्तिंनी बिल्डरकडून दोन लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली असून खंडणी प्रकरणात सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया

बांधकाम व्यावसायिकांची तक्रार

नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०, रा. हडपसर), सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८, रा. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय २५) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि आकाश शरद निकाळजे (वय २४, रा. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगणारा फोन आला होता. ॲपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन आरोपींनी त्यावरुन बांधकाम व्यवसायिकाला फोन केल्याची माहिती आहे. बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही गॅंग गुगल प्ले स्टोरवर जाऊन फेक कॉल अँपच्या साहाय्याने दुसऱ्याच्या नावाने कॉल करून धमकावत होते. यात जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर याआधी 4 गुन्हे दाखल आहे. अशी माहिती यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

या दिवसांपासून दिल्या जातात धमक्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगून आरोपींकडून दहा दिवसांपासून धमकीचा प्रकार सुरु होता. अखेर बिल्डरने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा - Vitthal-Rukmini Temple : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सजावट;पहा हा खास व्हिडिओ

Last Updated :Jan 14, 2022, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.