ETV Bharat / city

Ajit Pawar on Vedanta : वेदांताला टक्केवारी मागितल्याचे सिद्ध करा - अजित पवार

author img

By

Published : Oct 6, 2022, 10:40 AM IST

Updated : Oct 6, 2022, 1:59 PM IST

अजित पवार
अजित पवार

वेदांता प्रकल्पावरून टक्केवारी मागितली हे सिद्ध करा, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाकरिता यापूर्वीच्या सरकारने टक्केवारी मागितल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे वेदांता प्रकल्पावरून टक्केवारी मागितली हे सिद्ध करा, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाकरिता यापूर्वीच्या सरकारने टक्केवारी मागितल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर त्याचे मोठे राजकीय पडसाद यापूर्वीच उमटले आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेनेने शिंदे सरकार आणि भाजपला खिंडीत पडकले ( Vedanta Foxconn project Case ) आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. वेंदाता प्रकल्पात किती टक्केवारी मागितली, असा गंभीर आरोप ( Serious Allegation of BJP Leader Ashish Shelar ) करीत शिवसेनेने हिशोब द्यावा, अशी मागणी केली होती. शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चांगलाच चिघळणार ( Shiv Sena has Hit Shinde Government and BJP ) आहे.

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार


वेदांतावरून चिखलफेक : पुण्यातील तळेगावला होणारा ​​वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तीन कंपन्यांच्या शर्यतीत कुठेही नसलेल्या गुजरातमध्ये हा प्रकल्प गेल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, वेदाताचा राज्यातील प्रकल्पाबाबतचा अहवाल बाहेर आला आहे.

शेलारांचा सरकारवर आरोप : मुख्यमंत्री शिंदे यांनी वेदांता महाराष्ट्रात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अचानक हा प्रकल्प गुजरात गेल्याने विरोधकांकडून टीकेची धार तीव्र झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरून शिवसेना आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टोला लगावला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात राहावा, यासाठी वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले होते, असा सवाल शेलारांनी विचारला आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांचाही आरोप : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती दौऱ्याच्यावेळी थेट महाविकास आघाडीवर आरोप केला होता. महाराष्ट्रातून वेदांता- फॉक्सकॉन (vedanta foxconn project) एक प्रकल्प गेला म्हणुन आरडाओरडा करणाऱ्या विरोधकांनी केंद्राचे चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (finance minister nirmala sitharaman) यांनी उपस्थित केला होता. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या औद्योगिक नुकसानास (Industrial loss of Maharashtra) जबाबदार आहे. अस त्या म्हणाल्या. निर्मला सीतारामण पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पावर बोट ठेवले होते.

दसरा मेळाव्यातील भाषण सगळ्यांनी बघितलं. उद्धव ठाकरेंचं शिवाजीपार्कवर आणि एकनाथ शिंदेंनी बीकेसीतील मैदानावरील मेळाव्यात काय मार्गदर्शन केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. त्यांनी त्यांचे विचार सर्वांसमोर ठेवलं आहे. त्यांचे पक्षांतर्गत प्रश्न असल्याने सर्वांना उत्सुकता होती. कशी गर्दी होती, काय होती हे पण मीडियाने दाखवलं. चहा, मिळाला का, नाष्टा मिळाला का ? हे मीडियाने दाखवलं, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत बोलताना माध्यमांना चिमटा काढला.



अजित पवारांचा बारामती दौरा - मी दोघांची भाषणं ऐकली. पहिलं उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टीपणी करण्याची गरज नाही. आम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केलं. ठाकरे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंसोबतही काम केले. या राजकीय बाबी आहेत. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे ? पुढची भूमिका काय असली पाहिजे ? कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे ? कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे ? याचा विचार त्यांनी करावा, असं अजित पवार म्हणाले.


तुम्हाला कुणाचं भाषण आवडलं ? हा प्रश्न अजित दादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला - ही काही आवडी निवडी करता भाषणं नव्हती. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. यामुळे अशा गोष्टी करता कामा नये. जनतेसाठी गाव तिथे एसटी हे धोरण राबलं गेलं. त्यांच्यासाठी एसटी आहे. कशा प्रकारे याचा वापर झाला हे दिसलंच, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला. दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत अजित पवारांना कोपरखळी मारली.


प्रकल्प सरकारच्या कमीपणामुळे गेला - वेदांताबद्दल मीच माध्यमांना दाखवलं होतं. वेदांताला अजून कोणत्या सवलती द्यायच्या, यासंदर्भातील बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. १५ किंवा १६ जुलैला ही बैठक झाली. आपल्याकडे बैठकीचे मुद्दे आहेत. सरकार आमचं जूनला पायउतार झालं. जूनला सरकार गेल्यानंतर जुलैमध्ये मुख्य सचिव उच्चाधिकार समितीची बैठक घेतात. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला हे शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळे गेला. राज्यात जे सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार केंद्रातही आहे. पण हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल, हे झाकण्यासाठी लपवण्यासाठी हे वक्तव्य केलं गेलं. विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच सांगता येतोय आणि आता टक्केवारीचा आरोप करताय. हे निरर्थक आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं, कोणी टक्केवारी मागितली ते खोटं आहे, असं आव्हान अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं.

Last Updated :Oct 6, 2022, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.