ETV Bharat / city

Goa CM Pramod Sawant : गोव्यात पुढील पाच महिन्यात मायनिंग सुरू होणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

author img

By

Published : Jul 20, 2022, 4:30 PM IST

CM Pramod Sawant
मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात पुढच्या पाच महिन्यात मायनिंग सुरू होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. विधानसभेत ते बोलत होते. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मायनिंगमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार ( Corruption during Congress government ) झाल्याचे कारण देऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ( Manohar Parrikar ) यांनी खाणबंदी करण्याविषयी कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून सदर विषय हा न्यायालयात प्रलंबित होता.

पणजी - मागच्या काही वर्षापासून बंद असलेले मायनिंग पुढील पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी विधानसभेत दिली. मायनिंग बंद झाल्यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली होती. हाच महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत हाताशी धरून विरोधकांनी सरकार विरोधात आवाज उठला होता.

2012 पासून मायनींग बंद - तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मायनिंगमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार ( Corruption during Congress government ) झाल्याचे कारण देऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ( Manohar Parrikar ) यांनी खाणबंदी करण्याविषयी कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून सदर विषय हा न्यायालयात प्रलंबित होता. दरम्यान मधल्या काळात विरोधकांनीही वेळोवेळी सरकारला धारेवर धरत मायनिंग सुरू करण्याविषयी विनंती केली होती.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत राजकारण - मायनिंग बंद झाल्यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले ( People Lost Their Jobs ) होते. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली ( Unemployment increased ) होती. हाच महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत हाताशी धरून विरोधकांनी सरकार विरोधात आवाज उठला होता. आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसच्या ( AAP and Trinamool Congress ) अजंड्यावर हे महत्त्वाचे विषय होते. त्यांनी याविषयी प्रचंड जनजागृती करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. 2022 या विधानसभा निवडणुकीत मायनिंग क्षेत्रात राज्याच्या बड्या नेत्यांनी भेटी देऊन तेथील जनतेकडून सहानुभूती मिळवण्याचा ही प्रयत्न केला होता.

5 महिन्यात मायनिंग सुरू करणार - येत्या पाच महिन्यात खाणींचा लिलाव करून मायनिंग सुरू करण्यापासून सर्व कायदेशीर बाबी तपासूनच पूढील मायनिंग सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

मायनिंगवर राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून - राज्यात अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा साधन म्हणजे मायनिंग. पण मागच्या दहा वर्षापासून बंद असलेल्या मायनिंगमुळे खाण प्रभावित क्षेत्रातील लोकांना त्याचा फार मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी यावेळी वेळोवेळी उठावही झाले मात्र ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे सरकारने मायनिंग सुरू करण्याविषयी हतबलता दाखविली होती. राज्यात मायनिंग बंदी झाल्यामुळे मायनिंगवर अवलंबून असणारे अनेक उद्योग बंद पडले आहेत. यात टेम्पो ट्रक वाहतूक, जहाज बांधणी, जहाज वाहतूक त्याचप्रमाणे अनेक लोकांचे रोजगार गेले म्हणून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य साधन असलेल्या मायनिंग बंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम झाले.

हेही वाचा - Shiv Sainik wrote letter to Uddhav Thackeray: आम्ही तुमच्यासोबत... कोल्हापुरातील शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.