ETV Bharat / city

Goa Assembly 2022 : 'घोडेबाजारात घोडे विकले जातात, शिवसेनेचे वाघ...,' आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला

author img

By

Published : Feb 12, 2022, 3:11 PM IST

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

मागील निवडणुकीत भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे गोव्यात आम्ही सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray Criticized Bjp ) केली.

पणजी - भाजपाने मागच्या अनेक निवडणुकांत आमच्या पाठीत खंजीर खुपसले. म्हणून गोव्यात आम्ही सर्वच निवडणुका या स्वबळावर लढणार आहोत. जर राज्यात उमेदवार निवडून आले तर, शिवसेनेचे वाघ घोडेबाजारात विकले जाणार नाही, असा टोला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला लगावला ( Aaditya Thackeray Criticized Bjp ) आहे. ते पणजीत बोलत होते.

प्रसारमाध्यमांना बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "गोव्यात पर्यटनाचा विकास झाला. मात्र, त्यातून व्यावसायिकांचे भले झाले आणि गुन्हेगारी व बेरोजगार वाढीस सुरु झाली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आम्ही पर्यटन पॉलिसी तयार करून पर्यटन वाढीस चालना देणार आहे."

राज्यात भाजपाने मूळ प्रस्थापितांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले. त्यामुळे आम्ही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी पणजीची उमेदवारी मागे घेतली, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी घराणेशाही वरून भाजपावर टीका केली.

शिवसेनेचे वाघ विकले...

जर राज्यात उमेदवार निवडून आले तर, शिवसेनेचे आमदार विकले जाणार नाही. कारण घोडेबाजारात घोडे विकले जातात शिवसेनेचे वाघ आहेत, ते विकले जाणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - ST Employee Strike : कोल्हापुरात एसटी कर्मचारी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.