बेधडक नितीन गडकरी : पत्नीला न सांगताच 'सासऱ्या'च्या घरावर चालवला होता 'बुलडोझर'!!

author img

By

Published : Sep 17, 2021, 4:11 PM IST

Updated : Sep 17, 2021, 4:22 PM IST

नितीन गडकरी

केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नीला न सांगताच रामटेकमधील सासऱ्यांच्या घरावर बोलडोझर चालवला होता. त्यांनी हा किस्सा हरियाणामधील एका भाषणात सांगितला होता. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

नागपूर - थेट, बेधडक, बिनधास्त, स्पष्टवक्ते आणि परिणामाची तमा न बाळगता वक्त्यव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांचे हरियाणा मधील एक भाषण चांगलेच व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे युती सरकारच्या काळात नितीन गडकरी ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांच्या सासऱ्यांचे घर आले. तेव्हा त्यांनी पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होताे अशी माहिती त्यांनी देताच उपस्थित लोकांमध्ये हास्य कल्लोळ झाला.

बेधडक नितीन गडकरी

नितीन गडकरींनी सासऱ्याच्या घरावर चालवला होता बुलडोझर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सोबत दिल्ली- मुंबई एक्सप्रेस-वे च्या निर्माण कार्याची पाहणी केली. त्यानंतर हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. त्याच वेळी या एक्सप्रेस-वे मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे निवासस्थान आले तेव्हा तेव्हा त्यांनी पुढचा कोणताही विचार न करता घर तोडण्याची परवानगी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना दिली, या बद्दल माहिती समजताच गडकरी यांनी मुख्यमंत्री खट्टर यांचे अभिनंदन करताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना घडलेला एका प्रसंगाची माहिती दिली. नवे-नवे लग्न झाले होते तेव्हा रामटेक येथील त्यांच्या सासऱ्यांचे घरदेखील रस्त्याच्या मधोमध आल्याने पत्नीला कळू न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता. विकासाचे राजकारण करत असताना नेत्यांनी अतिक्रमण वाचवण्याचे प्रयत्न करू नये, असं देखील ते म्हणाले.

बेधडक गडकरी

चार दिवसांपूर्वी राजस्थान मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सुद्धा गडकरी यांनी बेधकड वक्त्यव्य करत राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. आमदार झाल्यानंतर मंत्री होण्याची ईच्छा असते,मंत्री झाल्यानंतर चांगलं खात मिळालं नाही म्हणून मंत्री नाराज, तर कुणी मुख्यमंत्री झालो नाही म्हणून नाराज असल्याचं वक्त्यव्य केलं होतं.

हेही वाचा - कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये

Last Updated :Sep 17, 2021, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.