कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये

author img

By

Published : Sep 17, 2021, 3:04 PM IST

नितीन गडकरी

युट्युबरच्या कमाईची आकडेवारी तुम्ही ऐकली असेल. पण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील युट्युबमधून चांगली आर्थिक कमाई करतात. वाचा, सविस्तर.

नवी दिल्ली - युट्युबचा वापर करून अनेक युट्युबर पैसे कमवितात. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील मागे नाहीत. व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्यानंतर मिळणाऱ्या कमाईचा आकडाहीही केंद्रीय मंत्री गडकरींनी जाहीर केला आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी फावल्या वेळेचा उपयोग करून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत. कोरोनाच्या काळात मंत्र्यांचे दौरेही थंडावले होते. अशा काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लॉकडाऊनमधील नवीन दोन गोष्टी केल्याची माहिती एका कार्यक्रमात सांगितली. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, कोरोनाच्या काळात घरामध्ये स्वयंपाक आणि विविध परिषदांमध्ये भाषण देण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. आज मला युट्युब दर महिन्याला चार लाख रुपये देते.

हेही वाचा-मोदींच्या बर्थडेला मिळणार गिफ्ट? पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्याने होतील कमी?

भारतामध्ये युट्युब प्रेक्षकांची वाढली संख्या

युट्यु इंडियाच्या माहितीनुसार चालू वर्षात मे महिन्यात दोन कोटीहून अधिक लोकांनी टीव्ही स्क्रीनवर युट्युब पाहिले. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे युट्युबवर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भारतीय भाषांमध्ये कंटेन्ट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्यादेखील वाढत आहे.

डिजीटल मार्केटिंग तज्ज्ञांच्या माहितीनुसार युट्युबवर व्हिडिओला चांगले व्हिव आणि नवीन चांगले कंटेन्ट असेल तर त्यापासून युट्युबरची चांगली कमाई होऊ शकते.

हेही वाचा-मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.