नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

author img

By

Published : Aug 22, 2021, 2:02 PM IST

नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत रविवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विदर्भ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने आंदोलक आणि विरोधी गटात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

नागपूर : येथील गंगा-जमुना वस्तीत रविवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विदर्भ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने आंदोलक आणि विरोधी गटात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
रविवारी तणावाची स्थिती

गंगा-जमुना वस्तीत अवैध धंदे चालत असल्याचे कारण देत ही वस्ती पोलिसांकडून सील करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांचा इथे चालणाऱ्या बाबींना विरोध आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. तर ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. रविवारी आंदोलक आणि स्थानिक नागरिक आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दोन्हीकडच्या लोकांना थांबविण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचेही चित्र यावेळी बघायला मिळाले.

नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधनाचे आयोजन

रविवारी ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात गंगा-जमुना परिसरात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या रक्षणासाठी भाऊ म्हणून उभी राहिल अशी भूमिका ज्वाला धोटे यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे, ज्वाला धोटे यांचे वडील कै. जांबुवंतराव धोटे हे गंगा-जमुना वस्तीतील महिलांच्या हाताने राखी बांधून घ्यायचे.

नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की


हेही वाचा - गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध, सील केलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.