ETV Bharat / city

गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध, सील केलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलन

author img

By

Published : Aug 15, 2021, 5:06 PM IST

Updated : Aug 15, 2021, 5:20 PM IST

11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी शहरातील रेडलाईट एरिया असलेला गंगा जमुना परिसर बॅरिकेड्स लावून सील केला. या परिसरामध्ये देहव्यापार करण्यास पोलिसांनी मनाई केली असून या ठिकाणी बाहेरून ग्राहक जाऊ नये यासाठी ही वस्ती सील करण्यात आली होती. या वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बेकायदेशीररित्या देहव्यापार करून घेतला जातो. या वस्तीत गुन्हेगार आणि अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले.

गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध
गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध


नागपूर - शहरातील वारांगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना या ठिकाणी पोलिसांच्या कारवाई केली . चार दिवसांपूर्वी पोलिसांनी देहव्यापार अवैध व्यवसाय चालत असून अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणले जात असल्याचा कारणावरून हा परिसर 1 वर्षासाठी सील केला होता. या कारवाईचा निषेध करत विदर्भावीर दिवंगत जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे यांनी आंदोलन केले. आज(रविवारी) हेच लावलेले बॅरिकेटिंग तोडून आंदोलन करण्यात आले.

गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध
11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी शहरातील रेडलाईट एरिया असलेला गंगा जमुना परिसर बॅरिकेड्स लावून सील केला. या परिसरामध्ये देहव्यापार करण्यास पोलिसांनी मनाई केली असून या ठिकाणी बाहेरून ग्राहक जाऊ नये यासाठी ही वस्ती सील करण्यात आली होती. या वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बेकायदेशीररित्या देहव्यापार करून घेतला जातो. या वस्तीत गुन्हेगार आणि अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले. यामुळे गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रकरणांवर अंकुश बसवा म्हणून हा परिसर सील करण्याची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले असल्याचेही पोलिसांनी लावलेल्या कारवाईच्या नोटीसमध्ये उल्लेख केला आहे.
गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध
गंगा-जमुना वस्तीवरील पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध

जागा हडपण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप-

पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत रविवारी सकाळी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला जांबुवंतराव धोटे गंगा जमुना वस्ती पोहोचल्या आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरू केले. पोलिसांनी ही वस्ती सील करून मोठी जागा धनदांडग्यांच्या घशात टाकण्याचा डाव रचल्याचा आरोपही त्यांनी केला. पण या वस्तीतील घर त्यांच्या मालकीचे असून त्यांना हाकलता येणार नाही. दुसरे देहव्यापार बंद करायाचा असेल तर त्यांना शासकीय नोकऱ्या देणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी ज्वाला धोटे यांनी पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेटिंग तोडून फेकले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारांगणा सोबत होत्या शिवाय हा मोर्चा संपूर्ण गंगा जमुना वस्तीत फिरला आणि पोलिसांकडून लावण्यात आलेल्या सर्व बॅरिकेटिंग काढून वस्ती पुन्हा खुली केली.


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा बंदोबस्तात लावला होता. आंदोलकांनी कायद्याचे उल्लंघन केले. यावर नागपूर झोन तीनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी कायदेशीररित्या योग्य ती करवाई केल्या जाईल, असा इशारा दिला. या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यामुळे यात हे आंदोलन एवढ्यात शांत होणार असे कुठलेच चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पुढील कारवाई काय होणार याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.


यावेळी काही वारांगणा यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी पोलिसांनी चुकीची करवाई केल्याचा आरोप केला आहे. हा व्यवयाय बंद पडल्यास आम्ही कुठे जावे, आम्ही अनेक वर्षांपासून या वस्तीत राहून आमचे जीवन व्यथित करत आहे. आमच्या मुला बाळांना शिकवण्यासाठी लागणार खर्च हा सगळा व्यवसायात निघतो. आमच्या पुढल्या पिढीने हा व्यवसाय करु नये, असेही त्या म्हणाल्या. आम्ही इथेच मरू असा सूर त्यांनी धरला. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहे. आम्ही कुठे जावे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Last Updated :Aug 15, 2021, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.