ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2021 : सहलीला गेलेले भाजपाचे 'ते' नगरसेवक नागपुरात परतले

author img

By

Published : Dec 8, 2021, 3:58 PM IST

Updated : Dec 8, 2021, 4:10 PM IST

सहलीला गेलेले भाजपा नगरसेवक
सहलीला गेलेले भाजपा नगरसेवक

सहलीसाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नागपुरात परतले ( Corporator Returned to Nagpur ) आहेत. नागपूरला परत आल्यानंतर सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या ( Corporator Bharatiya Janata Party ) अभ्यास वर्गात सहभागी होण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Elections ) अंतर्गत होत असलेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या ( Vidhan Parishad Election ) मतदानाला आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सहलीसाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नागपुरात परतले ( Corporator Returned to Nagpur ) आहेत. नागपूरला परत आल्यानंतर सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या ( Corporator Bharatiya Janata Party ) अभ्यास वर्गात सहभागी होण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. नगरसेवकांचे विमानतळावर आगमन होणार असल्याने कोणताही दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी शहराध्यक्ष प्रवीण दटके ( City President Praveen Datke ) आणि सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे हे देखील विमानतळावर उपस्थित होते.

विमानतळावरुन आढावा घेतांना प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षासह काँग्रेसने सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांच्यात थेट लढत होत आहे. छोटू भोयर हे भाजपाचे बंडखोर नगरसेवक असल्याने त्यांचे भाजपाच्या नगरसेवकांसोबत मैत्रीचे आणि जिव्हाळाचे संबंध आहेत. छोटू भोयर यांच्याकडून भाजपा नगरसेवकांना संपर्क साधला जाणार असल्याची दाट शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाजपाने सर्व नगरसेवकांना सहलीकरिता जम्मू काश्मीर, गोवा, पुणे येथे पाठवले होते. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने सर्व नगरसेवक आज नागपूरला परत आले आहेत.
  • नगरसेवकांची रवानगी अभ्यास वर्गात

भाजपाचे नगरसेवक हे सहकुटुंब सहलीला गेले होते. आज ते नागपुरात परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर नगरसेवकांची रवानगी थेट भाजपाच्या अभ्यास वर्गात करण्यात आली आहे. दोन दिवस हा अभ्यास वर्ग चालणार आहे. १० डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतरच हे नगरसेवक घरी जाऊ शकतील.

  • देवेंद्र फडणवीस दोन दिवस नागपुरातच

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळे ते आज पहाटेच नागपुरात दाखल झाले असून पुढील दोन दिवस ते नागपुरातच मुक्कामी असून भाजपाच्या अभ्यास वर्गात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : फडणवीसांच्या अडचणी वाढल्या; 'त्या' खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार

Last Updated :Dec 8, 2021, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.