ETV Bharat / city

Monsoon Session शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे गटाकडून व्हिप जारी

author img

By

Published : Aug 17, 2022, 9:47 AM IST

Updated : Aug 17, 2022, 11:01 AM IST

Shiv Sena
शिवसेना

विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू shiv sena pratod prabhu यांनी हा व्हिप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचे या पक्षादेशात म्हटले आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट विधानभवनात पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत.

मुंबई पावसाळी अधिवेशनाच्या Monsoon Session 2022 आधी शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचे या पक्षादेशात म्हटले आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट विधानभवनात पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत.



२२ ऑगस्टला पुढची सुनावणी होणार राज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. येत्या २२ ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे. तर शिवसेना आणि चिन्हाचा वाद देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या एकूण सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाचा वादाचाही विषय आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व ५५ आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू shiv sena pratod prabhu हे पक्षादेश काढले आहेत.




सभागृहात मतदान होण्याची शक्यता पावसाळी अधिवेशनात विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात मांडले जातील. या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याकरता सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूने मतदान व्हावे, याकरता सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. यानुसार, या व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते. दरम्यान, शिंदे गटाकडून भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याने ठाकरे गटाने बनवलेला व्हिप अधिकृत ठरेल का हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा Monsoon Session 2022 शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याची सूत्राची माहिती


Last Updated :Aug 17, 2022, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.